IMPIMP

Railway Protection Force (RPF) | रेल्वे सुरक्षा दलात (RPF) भरतीची जाहिरात बोगस, विश्वास न ठेवण्याचे रेल्वे प्रशासनाकडून आवाहन

by nagesh
Railway Protection Force RPF | railway recruitment 2022 advertisement for recruitment in railway security force is bogus railway administration said don not to believe in advt

नागपूर :  सरकारसत्ता ऑनलाइन – Railway Protection Force (RPF) | उत्तर भारतातील काही वेब पोर्टलवर काही दिवसांपूर्वी रेल्वे सुरक्षा दलात Railway Protection Force (RPF) तब्बल 900 पदासाठी भरतीची (Railway Recruitment) जाहिरात प्रसिद्ध झाली होती. मात्र ही जाहिरात (Advertisement) बोगस (Bogus) असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून (Railway Administration) जाहीर करण्यात आले आहे. रेल्वे सुरक्षा दलात कॉन्स्टेबलच्या (Constable) 900 पदासाठी भरतीची (Railway Recruitment) जाहिरात बोगस असून या जाहिरातीवर विश्वास ठेऊन कोणीही अर्ज करु नये, असे आवाहन रेल्वे सुरक्षा दलाचे नागपूर मंडळाचे विभागीय सुरक्षा आयुक्त (Divisional Security Commissioner, Nagpur Board) आशुतोष पांडे (Ashutosh Pandey) यांनी केले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

उत्तर भारतातील काही वेब पोर्टलवर नागपूर रेल्वे सुरक्षा दलाच्या (Nagpur Railway Protection Force ) भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीमध्ये नागपूर रेल्वे सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदाच्या 900 रिक्त जागांसाठी भरती (Railway Recruitment) सुरु असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) या जाहिरातीसंदर्भात आता स्पष्टीकरण दिले आहे. नागपूर सुरक्षा दलातील रिक्त जागांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात बोगस असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे. Railway Protection Force (RPF)

 

जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर हजारो तरुण-तरुणी या भरतीच्या तयारीला लागले होते.
काही जणांनी तर रेल्वे अधिकाऱ्यांना संपर्क साधून तयारीबाबत मार्गदर्शनही (Guidance) करण्यास सांगितले होते.
परंतु रेल्वेकडून अशी कोणतीही जाहिरात दिली नसल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.
त्यामुळे कोणीतरी तरुणांची फसवणूक करत असल्याने आता रेल्वे अधिकाऱ्यांनी याबाबत स्पष्टीकरण देऊन खुलासा केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :-  Railway Protection Force RPF | railway recruitment 2022 advertisement for recruitment in railway security force is bogus railway administration said don not to believe in advt

 

हे देखील वाचा :

Fort In Pune | पुणे जिल्ह्यातील गड-किल्ल्यांसह सर्व पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी बंद, ‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाचा मोठा निर्णय

Indian Railway New Guidelines | प्रवाशांनो लक्ष द्या ! ‘इथं’ रेल्वेने प्रवास करण्यापूर्वी नवीन गाइडलाइन जरूर वाचा

Pune Crime | भाडेकरु तरुणाने केला घर मालकिणीवर बलात्कार, आरोपी तरुणावर FIR

 

Related Posts