IMPIMP

Telecom Sector Hiring | टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये होणार बंपर नोकरभरती; तरुणांना काम करण्याची सुवर्णसंधी

by sachinsitapure
Telecom Sector Hiring | jobs in telecom sector reliance jio vodafone bharti airtel will increase workforce by 25 percent

सरकारसत्ता ऑनलाईन – देशातील तरुणांना टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये (Telecom Industry) काम करण्याची सुवर्णसंधी येत्या काही महिन्यांमध्ये मिळणार आहे. आपल्या इथे मोठ्या प्रमाणामध्ये या इंडस्ट्रीची वाढ होत आहे.
त्यामुळे महत्त्वाच्या टेलिकॉम इंडस्ट्री त्यांच्या कर्मचाऱ्यांची संख्या (Telecom Sector Hiring) झपाट्याने वाढवणार आहेत.
जिओ (Reliance Jio), एअरटेल (Airtel), वोडाफोन आइडिया (Vodafone Idea) या कंपनी त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये 25 टक्क्यांनी वाढ करणार आहेत.
2023 मध्ये 5G चे युग चालू झाले असून येत्या वर्षांत याचा मोठा विस्तार होणार आहे.
याच पार्श्वभूमीवर टेलिकॉम कंपनी (Telecom Sector Hiring) त्यांच्या कर्माचाऱ्यांमध्ये वाढ करणार असून ही बाब अनेक तरुणांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, यावर्षीपासून, भारताच्या टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये नोकरभरती 40 ते 45 टक्क्यांनी वाढू शकते.
देशात 5G च्या वाढत्या प्रभावामुळे (5G Internet Service) आणि गरजेमुळे पुढील 6 महिन्यांत नवीन भरतीच्या गतीमध्ये 30 ते 36 टक्क्यांनी वाढ होणार आहे.
देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओ इन्फोकॉमने (Reliance Jio Infocomm) असे सांगितले आहे की ती आता देशभरात 26 गिगाहर्ट्झ मिलीमीटरच्या वेगाने 5G सेवा दिली जात आहे.
देशात वाढत्या 5G इंटरनेटच्या सेवेच्या मागणीसाठी ही नवीन नोकरभरती केली जात असून ही तरुणांना कामाची चांगली संधी मिळणार आहे.
जिओ बरोबरच एअरटेल कंपनीने देखील त्यांचे कर्मचारी वाढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.

देशातील टेलिकॉम इंडस्ट्री अनेक दिवसांपासून कोणाला हायर (Telecom Sector Hiring) करत नव्हते.
कोरोना काळामध्ये कंपनीने अनेक कर्मचाऱ्यांना नुकसान होत असल्याने कामावरुन काढले होते.
आणि आत्तापर्यंत नवीन लोकांना कामावर घेणे बंदच करुन टाकले होते.
मात्र आता दूरसंचार विभाग अद्ययावत होत असून या इंडस्ट्री नवीन व हुशार कर्मचाऱ्यांची गरज आहे.
देशातील तरुणांसाठी ही संधी महत्त्वाची ठरणार आहे.

 

Related Posts