IMPIMP

Nashik Crime | रिसॉर्टमध्ये डॉक्टर वधुच्या ‘कौमार्य’ चाचणीचा प्रकार उघडकीस; नाशिक जिल्ह्यातील धक्कादायक घटना

by nagesh
Pune Crime | Earlier a youth was stabbed and six others were remanded in police custody

नाशिक : सरकारसत्ता ऑनलाइन Nashik Crime | अनेक ठिकाणी खेड्या-पाड्यात कौमार्य चाचणीचा (Virginity test) प्रकार घडताना समोर येतो. खरंतर पारधी समाजात अशा घटना अधिक वाढीस लागल्या आहेत. अशाच पद्धतीचा प्रकार नाशिक जिल्ह्यातून (Nashik Crime) उघडकीस आला आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावरील एका हाॅटेलमध्ये (nashik trimbakeshwar road hotels) उच्च शिक्षित वधु -वराचा विवाह सोहळा काल (रविवारी) पार पडला. जात पंचायतच्या पंचांकडून डॉक्टर असलेल्या नववधूची लग्नानंतर कौमार्य चाचणी घेण्यात येणार असल्याबाबची तक्रार ‘अंनिस’कडे प्राप्त झाली होती.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

या तक्रारीवरुन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti (अंनिस) कार्यकर्त्यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये (Trimbakeshwar Police Station) अर्ज दिला होता. तसेच त्या अर्जातून दुष्ट प्रथा थांबवण्यासाठी त्या अर्जातूव विनंती करण्यात आली होती. त्यानूसार त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक संदिप रणदिवे (Sr. PI Sandeep Ranadive) यांनी सदर हाॅटेल मालकाला नोटीस बजावली. तसेच काही अनुचित प्रकार (Nashik Crime) झाल्यास हॉटेल मालकाला जबाबदार ठरविण्यात येईल असं नोटीसमधून सांगण्यात आलं होतं.

 

तर, पोलिस विवाहस्थळी दाखल झाले. आणि अशी कौमार्य चाचणीबाबत (Virginity test) त्यांनी शहानिशा करून, संबंधितांचे जबाब घेतल्याचे समजते.
अशी काही परीक्षा होत नाही, असे त्यांचे म्हणणे असल्याचे समजते. त्यावेळी पोलिसांनी जात पंचायतींच्या पंचांना कायद्याची जाणीव करुन दिली.
त्यानूसार अशी कौमार्य परीक्षा होत नसल्याचे आणि करणार नसल्याचे लेखी लिहून दिल्याचे कळते.

जात पंचायतींच्या (jat panchayat) पंचांनी कानावर हात ठेवून अशी कौमार्य चाचणी होत नसल्याचे सांगितले.
पोलीसांनी कायद्याची जाणीव करून दिल्यावर अशी कौमार्य परीक्षा होत नसल्याचे आणि करणार नसल्याचे लेखी लिहून दिल्याचे कळते.
तसेच, समितीच्या कार्यकर्त्यांनी आज क्रूर प्रथेविरुद्ध समाजात पुन्हा प्रबोधन, जनजागृती साठी प्रयत्न केले.
पोलिसांचेही सहकार्य लाभले आहे. संघटनेच्या वतीने पोलिसांचे अभिनंदन आणि आभार व्यक्त केले गेले.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

दरम्यान, पोलिसांनी या प्रकारात व्यवस्थित लक्ष घालावे यासाठी विधानसभेच्या उप सभापती नीलम गो-हे (Neelam Gorhe) यांनी कृतीशील हस्तक्षेप केला होता.
आणि पोलिसांना सुचना केल्या होत्या. या मोहिमेमध्ये टी .आर .गोराणे (T.R.Gorane), कृष्णा चांदगुडे (Krishna Chandgude), वकील समीर शिंदे (Lawyer Sameer Shinde),
नितीन बागुल (Nitin Bagul), महेंद्र दातरंगे ( महेंद्र दातरंगे) , कृष्णा इंद्रीकर (Krishna Indrikar) , संजय हराळे (Sanjay Harale), दिलीप काळे (Dilip Kale) आदी कार्यकर्ते सामिल झाले होते.

 

Web Title : Nashik Crime | shocking kanjarbhat female doctor had to give virginity test nashik trimbakeshwar road hotels marathi news policenama

 

हे देखील वाचा :

Islampur Crime | पोलिसाचा महाविद्यालयीन तरुणासोबत ‘डर्टी पिक्चर’, पोलीस कर्मचारी गजाआड; पोलीस दलात प्रचंड खळबळ

Pune Corporation | महापालिका आयुक्तांनी खरेदीला लावलेला ‘ब्रेक’ नगरसेवकांनी केला ‘सैल’ ! बकेट, बेंचेस, कापडी पिशव्या खरेदीला मंजुरी

Madhavi Gogate | ऑनस्क्रीन आईच्या निधनानंतर अनुपमा फेम Rupali Ganguly ला मोठा धक्का, म्हणाली – ‘खुप काही शिल्लक राहिलं’

 

Related Posts