IMPIMP

खळबळजनक ! भाजप आमदाराच्या वाढदिवसाच्या पार्टीत गोळीबार; दोन जणांचा मृत्यू

by amol
MLA Birthday party firing

भोपाळ : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशच्या दमोहमध्ये सतत हत्येच्या घटना घडत असतात. काही दिवसांपूर्वी नरसिंगगडमध्ये एका व्यक्तीची गोळ्या Firing घालून हत्या केल्याची घटना ताजी असताना आणखी एक घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री जबेराचे भाजप आमदार धर्मेंद्र सिंह Dharmendra Singh यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमावेळी झालेल्या गोळीबारात Firing दोन जण ठार झाले आहेत. ही घटना घडली तेव्हा आमदार तिकडे उपस्थित नव्हते ते ८ वाजताच तिकडून निघून गेले होते.

काय हा नेमका प्रकार
कार्यकर्त्यांकडून बनवार येथे आमदार धर्मेंद्र सिंह लोधी Dharmendra Singh यांच्या वाढदिवसाच्या पार्टीचं आयोजन करण्यात आले होते. या पार्टीसाठी आमदार ७ वाजता तिकडे आले होते. पार्टी संपल्यानंतर आमदार त्या ठिकाणाहून निघून गेले. यानंतर अरविंद जैन हे कल्याण सिंह ऊर्फ कलू ठाकूर याला शिवीगाळ करत होते. यांचा आरडाओरडा ऐकून मोनू ऊर्फ जोगेंद्र पिता गोविंद सिंह राजपूत यांनी त्यांचे भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी केली. एवढ्यात कोणीतरी अचानक गोळीबार Firing केला आणि त्यामध्ये मोनू ऊर्फ जोगेंद्र राजपूत आणि अरविंद जैन हे दोघे जखमी झाले. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता.

अरविंद जैनची हत्या कोणी केली, हे अजून स्पष्ट झाले नाही. मृत मोनू ऊर्फ जोगेंद्रचे वडील म्हणाले की, त्यांचा मुलगा आणि कुटुंबीय घरी झोपलेले असताना कल्याण सिंहचा वाद झाला, याची माहिती मिळताच जोगेंद्र घरातून बाहेर गेला. तेव्हा ज्युनियर, राहुल आणि अन्य एक छोटा मुलगा या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी गोळ्या दिल्यानंतरच राहुल जैन याने गोळीबार केला. मोनू ऊर्फ जोगेंद्र राजपूत आणि अरविंद जैन यांचे मृतदेह जिल्हा रुग्णालयाच्या शवागृहात ठेवण्यात आले आहेत. सध्या पोलिसांकडून या घटनेचा तपास करण्यात येत आहे.

Related Posts