IMPIMP

मुंबई 1993 बॉम्बस्फोट : प्रकरणात नाव येताच संजय दत्तने मागितली होती बाळासाहेबांकडे मदत

by pranjalishirish
1993-mumbai-bomb-blast-28-years-completed-when-sanjay-dutt-and-sunil-dutt-met-to-Balasaheb-Thackeray-at-matoshree

मुंबई : मुंबईत झालेल्या 1993 बॉम्बस्फोटात अभिनेता संजय दत्त याचे नाव आले होते. त्यानंतर दत्त कुटुंबीयांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. संजय दत्तला या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी संजय दत्तचे वडील सुनील दत्त यांनी अनेक प्रयत्न केले होते. त्यासाठी ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे Balasaheb Thackeray  यांच्याकडेही गेले होते.

सुनील दत्त हे काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांपैकी एक होते. मात्र, त्यांना या प्रकरणात काँग्रेसकडून काही मदत मिळेल असे वाटले नाही. त्यावेळी सुनील दत्त यांना अभिनेते राजेंद्र कुमार यांनी बाळासाहेब ठाकरे Balasaheb Thackeray  यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला होता. मात्र, त्यांनी त्यावर संताप व्यक्त केला होता. बाळासाहेब ठाकरे यांची मदत घेण्यास नकार दिला होता. मात्र, अमिताभ बच्चन यांचे नाव जेव्हा बोफोर्स प्रकरणात आले होते. तेव्हा अमिताभ बच्चन यांची बाळासाहेब ठाकरे यांनी मदत केली होती. त्यानंतर सुनील दत्त हे बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेण्यास तयार झाले. त्यासाठी ते ‘मातोश्री’वर गेले होते.

बाळासाहेब ठाकरे Balasaheb Thackeray यांनी सुनील दत्त यांना मदतीचे आश्वासन दिले होते. त्यावेळी ते म्हणाले होते, की तुमची मदत करेन. मात्र, मी जे काही करणार आहे ते फक्त तुमच्यासाठी करणार आहे. संजय दत्तसाठी नाही. तसेच त्यांनी संजय दत्तला त्यावेळी खडसावून सांगितले होते. ‘तुझे वडील जे काही सांगतील तेच तू ऐकायचं. कोणत्याही मोहात पडू नकोस’.

Alos Read :

वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझेंची नागरी सुविधा केंद्रात बदली

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी ATS चे ‘क्राइम सीन’ प्रात्याक्षिक

Related Posts