IMPIMP

Ajit Pawar | लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना बाहेर पडू द्या, अजित पवार मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

by bali123
Ajit Pawar | those who got two doses of vaccines they should have permission to roaming says ajit pawar

पिंपरी चिंचवड : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आज (बुधवारी) पिंपरी-चिंचवडमध्ये आले होते. त्यावेळी पवार यांनी अनेक मुद्यावर भाष्य केलं आहे. तर कोरोनाचे दोन डोस (vaccine) घेतलेल्यांना आता बाहेर पडण्याची परवागनी दिली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. याबाबत मी दोन दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी (CM Uddhav Thackeray) चर्चा करणार असल्याचं अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटलं आहे. त्यावेळी अजित पवार यांनी पत्रकारांशी सवांद साधला.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

यावेळी बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, ‘लसीकरण (Vaccination) मोठ्या प्रमाणावर झालं आहे. त्यामुळे ज्यांना 2 डोस (vaccine) देण्यात आले आहेत. त्यांना बाहेर पडायला टप्प्याटप्प्याने सुरुवात केली पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत असल्याचं स्पष्ट अजित पवारांनी केलं आहे. तर यासंदर्भात मी परवा मुख्यमंत्र्यांशी बोलेल. पण लोकांना बाहेर पडण्याची मुभा द्यावी की देऊ नये याबाबतचे वेगवेगळे मतप्रवाह आहेत. असं देखील पवार यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, ‘काहींच्या मते इथून पुढे 100 ते 120 दिवस अत्यंत महत्त्वाचे
आहेत. या दिवसात लोकांनी नियमावलीचं तंतोतंत पालन केलं पाहिजे. सोलापुरातील एका गावात मी गेलो होतो. तेव्हा लोक मास्कशिवाय फिरताना दिसले. अशी बेपर्वाई बरी नाही. एक देखील बाधित व्यक्ती अनेकांना बाधित करू शकते. त्यामुळे बारकाईने वागण्याची गरज आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

या दरम्यान, ‘लोकसंख्येच्या प्रमाणत लस मिळायला हवी, लस उपलब्ध होत नसल्याने लसीकरणाचा
(Vaccination) वेग मंदावला आहे.
केंद्राने जुलैमध्ये लस मिळेल असं सांगितलं होतं.
परंतु, अद्याप पुरेशी लस मिळालेली नाही, असं सांगतानाच पूर्वी लस घेण्यापासून लोक कचरत होते.
आता लोक लस घेऊ लागले आहेत. लोकांची मानसिकता बदलली आहे.
ही सकारात्मक बाब असल्याचं देखील
अजित पवारांनी सांगितलं आहे.

Web Titel :  Ajit Pawar | those who got two doses of vaccines they should have permission to roaming says ajit pawar

Related Posts