IMPIMP

Ambil Odha Residents Protest | आंदोलनस्थळी पोहोचलेल्या खा. सुप्रिया सुळेंसमोर ‘अजित पवार मुर्दाबाद’च्या घोषणा

by bali123
Ambil Odha Residents Protest | mp supriya sule meets ambil odha residents protesting in front of pmc building

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनAmbil Odha Residents Protest | ऐन पावसाळा आणि कोरोना (Corona) संकटात पुणे शहरातील आंबिल ओढा (Ambil Odha) परिसरातील अनधिकृत बांधकामावर (unauthorized construction) पुणे महानगरपालिकेने (Pune Municipal Corporation) कारवाई केली. या विरोधात आज वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aaghadi) पुढाकारानं महापालिकेसमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांशी संवाद साधण्यासाठी आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना आंदोलकांच्या (Protest) रोषाचा सामना करावा लागला. वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी ‘अजित पवार (Ajit Pawar) मुर्दाबाद, महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government) मुर्दाबाद’ अशा घोषणा दिल्या. त्यामुळे याठिकाणी काही वेळासाठी गोंधळ निर्माण झाला. Ambil Odha Residents Protest | mp supriya sule meets ambil odha residents protesting in front of pmc building

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

हा प्रश्न संवेदनशीलपणे सोडवणं गरजेचं

आंबिल ओढा ( Ambil Odha) परिसरातील नागरिकांनी महापालिकेसमोर आंदोलन सुरु (Ambil Odha Residents Protest) केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या नागरिकांची भेट घेण्यासाठी आल्या होत्या. सुप्रिया सुळे यांनी जमिनीवर बसूनच येथील महिलांशी संवाद साधला.
त्यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aaghadi) स्थानिक कार्यकर्त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) मुर्दाबाद, महविकास आघाडी मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या.
या कार्यकर्त्यांना सुळे यांनी संयम राखण्याचं व राजकारण न करण्याचं आवाहन केलं.
मी इथं राजकारण करण्यासाठी आलेले नाही. हा प्रश्न संवेदनशीलपणे सोडवणं गरजेचं आहे, असे त्या म्हणाल्या. त्यानंतर कार्यकर्ते शांत झाले.
महापालिका अतिक्रमण विभागानं पाडलेली स्थानिकांची घरं बांधून देण्यात यावीत अशी मागणी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी यावेळी केली.

काय आहे प्रकरण ?

आंबील ओढ्याच्या (Ambil Odha) परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. ओढ्यामध्ये भर टाकून बांधकाम करण्यात आली आहेत.
त्यामुळे पावसाळ्यात आसपासच्या परिसरात पाणी तुंबते. तसेच मोठं नुकसान होतं, असं कारण देत मागील आठवड्यात महापालिकेनं येथील अतिक्रमणांवर कारवाई केली होती.
या कारवाई दरम्यान या ठिकाणी बांधण्यात आलेली घरे देखील पाडण्यात आली.
महापालिकेला कोर्टाने स्थगिती दिल्याने ही कारवाई मध्येच थांबवण्यात आली.
परंतु या कारवाईमुळे अनेक कुटुंब रस्त्यावर आली आहेत.
या कुटुंबांनी आज महापालिकेसमोर धरणे आंदोलन (Ambil Odha Residents Protest) केलं.

Web Title : Ambil Odha Residents Protest | mp supriya sule meets ambil odha residents protesting in front of pmc building

Related Posts