IMPIMP

Anil Deshmukh । ‘अनिल देशमुखांना आता कोरोना आठवतो? पैसे खाल्ले तेव्हा कोरोना नव्हता का?

by bali123
Anil Deshmukh । social activist anjali damania ncp anil deshmukh ed summons money laundering case

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Anil Deshmukh | तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना आज मंगळवारी सक्तवसुली संचलनालयाने (ED) समन्स बजावलं आहे. मात्र, अनिल देशमुख यांनी आपण प्रत्येक चौकशीदरम्यान हजर राहू शकत नसल्याचं सांगितलं आहे. तर, आपण जबाब ऑनलाईन देण्याची आपली तयारी असल्याचं देशमुख म्हणाले. परंतु, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी अनिल देशमुखांना (Anil Deshmukh) सवलत देऊ नये अशी विनंतीच सक्तवसुली संचलनालयाकडे (ED) केली आहे. social activist anjali damania ncp anil deshmukh ed summons money laundering case

अंजली दमानिया (Anjali Damania) म्हणाल्या, ‘अनिल देशमुखांना (Anil Deshmukh) आता कोरोना (Corona) आठवतो? पैसे खाल्ले तेव्हा नव्हता कोरोना?,’ अशी प्रतिक्रिया अंजली दमानिया यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. ‘ईडीने बिलकुल अपवाद करू नये. सर्वांसाठी कायदा समान असला पाहिजे. उद्या सगळेच म्हणतील आम्ही घरून उत्तर देऊ. मग काय अर्थ यंत्रणेचा?, असं देखील दमानिया (Anjali Damania) यांनी म्हटलं आहे. पुढे त्या म्हणाल्या, ‘भाजपाची (BJP) ही चाल आहे, पण तुमचे हातदेखील बरबटलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा शब्दात अनिल देशमुखाबरोबरच (Anil Deshmukh) भाजपलाही टोला लगावला आहे.

काय म्हणाले अनिल देशमुख?

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी मंगळवारी पत्राद्वारे म्हटलं आहे की,
मी जवळपास 72 वर्षांचा आहे, उच्च रक्तदाब आणि हृदयासंदर्भातील समस्या आणि विविध प्रकारच्या व्याधींनी ग्रस्त आहे. 25 जून रोजी जबाब नोंदवताना मी बरेच तास आपल्याशी संवाद साधला.
म्हणूनच, आज स्वत: उपस्थित राहणे योग्य नाही आणि मी माझा अधिकृत प्रतिनिधी पाठवत आहे. असं त्या पत्रात म्हटलं आहे.
तसेच, ED ने मागितलेली सर्व माहिती आणि कागदपत्रे सादर करणार असल्याचं देशमुख म्हणाले.
ED ने पाठवलेल्या समन्समध्ये वैयक्तिक स्वरुपातील उपस्थिती राहावं लागेल असं स्पष्ट केलेलं नसल्याचं देशमुख यांनी म्हटलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

या दरम्यान, मुंबईच्या बार मालकांकडून लाच (Bribe) म्हणून उकळलेल्या रक्कमेतील 4 कोटी 17 रुपये अनिल देशमुख यांनी नागपूर येथील श्री साई शिक्षण संस्थेत वळविल्याचा दावा ED ने कोर्टात केला होता.
ही रक्कम देणगी स्वरुपात प्राप्त झाल्याचा भ्रम निर्माण करण्यासाठी दिल्लीतील दोन व्यक्तींना देशमुख यांचे चिरंजीव ऋषीकेश यांनी नागपूरहून रोख रक्कम पाठवली.
तर या दोन व्यक्तींनी ही रक्कम अनिल देशमुख अध्यक्ष असलेल्या शिक्षण संस्थेच्या खात्यांवर जमा केली,
असं देखील ED ने कोर्टात सांगितलं आहे.
तसेच, ED ने देशमुख (Anil Deshmukh) यांच्या दोन सचिवांना देखील अटक केली आहे.

Web Title :-  Anil Deshmukh । social activist anjali damania ncp anil deshmukh ed summons money laundering case

Related Posts