IMPIMP

Video : 15 फेब्रुवारीला अनिल देशमुख आयसोलेट नव्हते असं म्हणत देवेंद्र फडणवीसांचा मोठा ‘गौप्सस्फोट’ !

by pranjalishirish
anil deshmukh was not isolated february 15 says devendra fadnavis

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh हे 15 ते 27 फेब्रुवारी दरम्यान आयसोलेट नव्हते. या काळात ते अनेक लोकांना आणि अधिकाऱ्यांना भेटले असं मला वाटत असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. यासंदर्भात शरद पवार यांनाही चुकीची माहिती दिली गेली आहे. त्यामुळं त्यांनी पत्रकारांनाही चुकीची माहिती दिली. त्यामुळं आता देशमुख एक्सपोज झाले आहेत असंही फडणवीस म्हणाले आहेत. एका पत्रकार परिषदेत बोलत असताना त्यांनी यावर भाष्य केलं.

पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटवरुन फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले- ‘मी आजच केंद्रीय गृहसचिवांना भेटतोय’

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी पत्र लिहित राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या या लेटरबॉम्बमुळं सध्या राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. कालच (सोमवार, दि 22 मार्च) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेत परमबीर सिंग यांनी पत्रात नमूद केलेले आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला. अनिल देशमुख 5 ते 15 तारखेपर्यंत कोरोनामुळं रुग्णालयात दाखल होते. 15 फेब्रुवारी रोजी त्यांना डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर ते 15 ते 27 फेब्रुवारी दरम्यान नागपुरात राहत्या घरी क्वारंटाईन होते असंही पवार म्हणाले आहेत. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही असंही त्यांनी सांगितलं. यानंतर फडणवीस यांनीही एक ट्विट करत पवारांच्या दाव्याची पोलखोल केली करत काही सवाल केले होते.

‘शरद पवारांच्या तोंडून चुकीच्या गोष्टी वदवून घेतल्या’, देवेंद्र फडणवीसांचा आरोप

पोलिसांच्या दैनिंदिन कार्यक्रमानुसार देशमुख मुंबईतच

देवेंद्र फडणवीस 15 तारखेची गृहमंत्र्यांची कार्यक्रम पत्रिका दाखवत म्हणाले, 15 तारखेला ते (देशमुख) Anil Deshmukh ते एका खासगी विमानानं आले होते. 15 तारखेपासून ते आपल्या घरी होते. मात्र माझ्याकडे पोलीस विभागाच्या दैनंदिन कामाचा कागद आहे. यानुसार 17 फेब्रुवारी एक तारीख आहे. यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari), मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) मुंबईत, तर अनिल देशमुख हे दुपारी 3 वाजता सह्याद्रीला येतील असं म्हटलं आहे. त्यानंतर 24 तारखेला पुन्हा अनिल देशमुख हे 11 वाजता मोटारीनं निवासस्थानी जाणार असल्याची पोलिसांची माहिती आहे असंही फडणवीस म्हणाले आहेत.

सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर ! वेतनात घसघशीत वाढ करुन वाढवले निवृत्तीचे वय, ‘या’ सरकारचा महत्त्वाचा निर्णय

’15 तारखेला देशमुख आयसोलेट नव्हते, तर अनेकांना भेटले’

देवेंद्र फडणवीस म्हणतात, काल पवारांना योग्य ब्रिफिंग देण्यात आलं नाही. पवारांसारख्या राष्ट्रीय नेत्याच्या तोंडून चुकीची माहिती दिली गेली आणि देशमुखांना Anil Deshmukh प्रोटेक्ट केलं गेलं. त्यामुळं ते एक्सपोज झाले आहेत. मला वाटतं की, देशमुख हे 15 ते 27 फेब्रुवारी दरम्यान आयसोलेट नव्हते. या काळात ते अनेक लोकांना आणि अधिकाऱ्यांना भेटले असंही फडणवीसांनी यावेळी सांगितलं.

Also Read :

मोठ्या शहरांमध्ये ‘लॉकडाऊन’ ची शक्यता ?

वेळ आल्यावर ‘करेक्ट’ कार्यक्रम’ ! ‘बदलीनंतर परमबीर सिंग दिल्लीत कोणाला भेटले? – राष्ट्रवादी

बीडमध्ये NCP चा शिवसेनेला धक्का ! महत्त्वाच्या नेत्यांसह 101 प्रमुख कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

‘ए भाई, तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय !’ अमृता फडणवीसांचा भाई जगतापांना इशारा

‘मी पुन्हा येईनचं स्वप्न अजूनही जिवंत !’ रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

67th National Awards : ‘छिछोरे’ बेस्ट हिंदी फिल्म, तर ‘मणिकर्णिका’ साठी कंगनाला बेस्ट अ‍ॅक्ट्रेस अवॉर्ड, पहा संपूर्ण लिस्ट

परमबीर सिंगांचा आणखी एक दावा; आता घेतलं रश्मी शुक्लांचं नाव अन् म्हणाले…

Nana Patole : ‘शेतकरी संघटनांच्या 26 मार्चच्या भारत बंदला काँग्रेसचा सक्रिय पाठींबा’

HM अनिल देशमुख यांच्यासाठी शरद पवार हे ’पावर बँक’ बनण्यामागे काय आहे ‘पॉलिटिक्स’?

‘क्लीनचिट द्यायला शरद पवार न्यायाधीश नाहीत’; पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचा टोला

महाविकास आघाडीसोबत 190 आमदार असल्याचा दावा; हसन मुश्रीफ यांनी दिले भाजपला ‘आव्हान’

Related Posts