IMPIMP

Aryan Khan Drugs Case | नवाब मलिकांचा गौप्यस्फोट, म्हणाले – ‘खंडणीसाठी ‘आर्यन’चं अपहरण, वानखेडेंशी घनिष्ठ मैत्री असणारे भाजपा नेते मोहित कंबोज मास्टर माईंड’ (व्हिडीओ)

by nagesh
aryan khan drugs case shah rukh khan son aryan khans abduction ransom mastermind bjp leader mohit kambojs case his ncp leader nawab malik ncb officer sameer wankhede

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  Aryan Khan Drugs Case | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात (Aryan Khan drugs case) आणखी एक मोठा गौप्यस्फोट करत भाजपासह एनसीबीचे समीर वानखेडे (NCB’s Sameer Wankhede) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे भाजपासह वानखेडेंच्या अडचणी वाढल्या आहेत.

मलिक यांनी आज माध्यमांना सांगितले की, मुंबई ड्रग्ज केस (Mumbai drugs case) मध्ये आर्यन खानला अडकवण्यात आले. त्याचे खंडणी (ransom) साठी अपहरण (kidnapp) करून 25 कोटींची मागणी केली गेली. खंडणीची 18 कोटींवर तडजोड झाली आणि 50 लाखांची रक्कम अगाऊ दिली गेली. परंतु, एका सेल्फीने खंडणीचा डाव फसला.

या प्रकरणात भाजपा नेते मोहित कंबोज मास्टर माईंड (BJP leader Mohit Kamboj is mastermind) असून ते समीर वानखेडे यांचे जवळचे मित्र आहेत, असेही मलिक यांनी म्हटल्याने भाजपासह समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
नवाब मलिक यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे राजकीय गटातही खळबळ उडाली आहे.

नवाब मलिक यांनी पत्रकारांना माहिती देताना म्हटले की, 2 ऑक्टोबर रोजी क्रूझवर कारवाई (Aryan Khan Drugs Case) झाल्यानंतर आर्यन खान आणि 8 लोकांना अटक केल्याचे वृत्त होते.
6 ऑक्टोबर रोजी मी यावर प्रश्न उपस्थित करत कारवाई खोटी असल्याचे म्हटले होते.
त्यावेळी दोन जणांने व्हिडीओ आम्ही मीडिया समोर मांडले.

या व्हिडिओत के.पी. गोसावी आणि मनीष भानुशाली (K.P. Gosavi and Manish Bhanushali) होता.
हे दोघे कोण आहेत, असा प्रश्न आम्ही विचारला होता. त्यानंतर NCB ने एक स्पष्टीकरण देत ते स्वतंत्र साक्षीदार असल्याचे सांगितले होते.
शिवाय एनसीबीने 9 साक्षीदारांची (9 witnesses) यादी जाहीर केली होती.

मलिक म्हणाले, क्रूझवर करण्यात आलेल्या कारवाईत अकरा जणांना पकडण्यात आले होते.
मात्र, एनसीबीकडून आठ जणांची नावे समोर आली तर तिघांना सोडण्यात आले होते.
भाजपाचे नेते मोहित कंभोज यांच्या मेहुण्याच्या (BJP leader Mohit Kambhoj’s brother-in-law) सांगण्यावरून या तिघांना सोडण्यात आले. (Aryan Khan Drugs Case)

मलिक पुढे म्हणाले की, ज्या तिघांना एनसीबीने सोडले त्या पाठीमागे मोठा डाव आहे.
ज्या दिवशी रिषभ सचदेवा (Rishabh Sachdeva) याचे नाव समोर आणले त्या दिवशी 1100 कोटींच्या बँक घोटाळ्यातील आरोपी असलेले मोहित कंबोज हे समोर आले. एकेकाळी काँग्रेसमध्ये असलेले कंबोज सत्ता बदलताच भाजपात गेले.
त्यांच्याबाबत 1100 कोटींच्या घोटाळ्याची यादी सीबीआय, ईडीकडे होती. तसेच वर्षभरापूर्वी त्यांच्यावर सीबीआयने धाड टाकली.
मात्र नंतर हे प्रकरण दाबले गेले.

नवाब मलिक म्हणाले, महिनाभरापासून मोहित कंबोज तडफडत आहेत.
आर्यन खानला कुणीतरी जहाजावर नेले, अशी माहिती कोर्टाच्या सुनावणीतून समोर आली होती.
त्याने तिकिट काढले नव्हते. प्रतीक गाभा आणि फर्निचरवाला यांच्यासोबच तो तिथे गेला. एकुणनच हे संपूर्ण प्रकरण खंडणीचे आहे.

या प्रकरणी आरोप करताना मलिक पुढे म्हणाले की, मोहित कंबोज यांच्या मेहुण्याच्या मार्फत अपहरणासाठी सापळा लावला गेला.
आर्यन खानला येथे पोहोचवण्यात आले. नंतर त्याचे अपहरण करून 25 कोटींची खंडणी मागण्यात आली. अखेर 18 कोटींवर तडजोड झाली.
त्यातील 50 लाख घेतले. परंतु एका सेल्फीने ही डिल फसली.

या अपहरण आणि खंडणी प्रकरणाचे मास्टर माईंट भाजपा नेते मोहित कंबोज आहेत.
अपहरण खंडणीमध्ये ते समीर वानखेडेंचे साथीदार असून ते वानखेडेंचे मित्र आहेत. (Aryan Khan Drugs Case)

 

Web Title : aryan khan drugs case shah rukh khan son aryan khans abduction ransom mastermind bjp leader mohit kambojs case his ncp leader nawab malik ncb officer sameer wankhede

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Aryan Khan Drugs Case | ‘सुनील पाटील हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, तोच आर्यन खान प्रकरणाचा मास्टरमाइंड’ – भाजपचे मोहित कंबोज

तुमच्याही PF Account मध्ये चुकीची असेल जन्मतारीख (DOB) तर तर तात्काळ ‘या’ पध्दतीनं करा दुरूस्त, अन्यथा अडकतील सर्व पैसे

Pandharpur Kartiki Ekadashi Yatra | तब्बल 20 महिन्यांनंतर पंढरपूर पुन्हा एकदा वारकर्‍यांनी गजबजणार ! जिल्हा प्रशासनाकडून कार्तिकी यात्रेस परवानगी 

Related Posts