IMPIMP

Aryan Khan Drugs Case | ‘सुनील पाटील हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, तोच आर्यन खान प्रकरणाचा मास्टरमाइंड’ – भाजपचे मोहित कंबोज

by nagesh
Aryan Khan Drugs Case | BJP activist mohit kamboj has made a sensational allegation that sunil patil is a ncp activist and is the mastermind of the aryan khan case NCB Raid on Cardilia Cruise Party

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन आर्यन खान प्रकरणावरुन (Aryan Khan Drugs Case) राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. आर्यन खान प्रकरणावरुन (Aryan Khan Drugs Case) भाजप (BJP) आणि सत्ताधारी यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच भाजपचे पदाधिकारी मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी कार्डिलिया क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणी (Cardilia Cruise Drugs Party Case) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर (NCP) मोठा आरोप केला आहे. क्रूझवरील ड्रग्स पार्टी प्रकरणी आर्यन खानसह इतरांना एनसबीच्या (NCB) जाळ्यात अडकवण्यात सुनील पाटील (Sunil Patil) या व्यक्तीने मास्टरमाइंडची (Mastermind) भूमिका पार पडली असून तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. एवढेच नाही, तर तो माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे पुत्र ऋषिकेश देशमुख (Rishikesh Deshmukh) यांचा अत्यंत जवळचा मित्र असल्याचा खळबळजनक आरोप मोहित कंबोज यांनी केला आहे. सुनिल पाटील याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक मंत्र्यांसोबत जवळचे संबंध आहेत, असा दावा देखील त्यांनी केला आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

सुनिल पाटीलने पार्टीबाबत माहिती दिली

 

मोहित कंबोज यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत हे खळबळजनक आरोप केले आहेत.
सुनील पाटील संदर्भात माहिती देताना ते म्हणाले की, सुनील पाटील याने 1 ऑक्टोबर या दिवशी सॅम डिसूझाला (Sam D’Souza) फोन केला होता.
मुंबईत क्रूझ पार्टी (Mumbai Cruise Party) होणार आहे ही माहिती त्याने डिसूझाला दिली.
तसेच या पार्टीत सहभागी होणाऱ्या 27 लोकांची माहिती माझ्याकडे आहे, अशी माहिती त्याने डिसूझाला दिली.
याबाबत मी मुंबई एनसीबीच्या अधिकाऱ्याशी बोलणार आहे असेही तो डिसूझाला म्हणाला.
यानंतर आपण एनसबीचे एक अधिकारी व्ही.व्ही. सिंग (V.V. Singh) यांच्याशी संपर्क करुन देऊ असे डिसूझा याने सुनील पाटीलला सांगितले, असा दावा कंबोज यांनी केला.

 

हा संपूर्ण कट सुनील पाटील यानेच रचला

 

क्रुझ पार्टी (Aryan Khan Drugs Case) संबंधित महत्त्वाची माहिती के.पी. गोसावी (K.P. Gosavi) याच्याकडे असल्याचे सुनील पाटील यानेच एनसीबीच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली.
याच सुनील पाटीलने सॅम डिसूझाला के.पी. गोसावी याचा नंबर दिला.
एवढेच नाही तर हा किरण गोसावीच (Kiran Gosavi) सर्व करणार आहे.
अशी माहितीही डिसूझा याला देण्यात आली. हे लक्षात घेता हा संपूर्ण कट सुनील पाटील यानेच रचला होता.
असा गंभीर आरोप कंबोज यांनी केला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

ऋषिकेश देशमुख यांच्या जवळचा मित्र

 

कंबोज पुढे म्हणाले, सुनील पाटील हा राष्ट्रावादीचा कार्यकर्ता असून तो महाविकास आघाडीच्या कोणत्या मंत्र्याच्या इशाऱ्यावर काम करत होता.
असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. सुनील पाटील बाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले.
पाटील याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुगा ऋषिकेश आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांशी जवळचे संबंध आहेत.

 

बदल्यांचे रॅकेट चालवत होता

 

हाच सुनील पाटील बदल्यांचे (Transfer) रॅकेट देखील चालवत होता, असा गंभीर आरोप कंबोज यांनी केला.
सुनील पाटील हा पैसे घ्यायचा आणि संबंधित मंत्र्यांना देत होता.
तो संपूर्ण राज्यात रॅकेट चालवत होता. परंतु सरकार बदलले आणि तो भूमिगत झाला.
महाविकास आघाडीचे सरकार (Maha Vikas Aghadi Government) आल्यानंतर सुनील पाटील पुन्हा सक्रिय झाला अशी खळबळजनक माहिती
देताना सुनील पाटील याच्या मोठमोठ्या हॉटेलमध्ये पार्ट्या चालत असत असा दावा कंबोज यांनी पत्रकार परिषदेत केला.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title : Aryan Khan Drugs Case | BJP activist mohit kamboj has made a sensational allegation that sunil patil is a ncp activist and is the mastermind of the aryan khan case NCB Raid on Cardilia Cruise Party

 

हे देखील वाचा :

Lunar Eclipse 2021 | काही दिवसातच होणार शतकातील ‘दिर्घ’ चंद्रग्रहण, भारतातील ‘या’ भागातून दिसणार

7th Pay Commission | खुशखबर ! 11.56 लाख सरकारी कर्मचार्‍यांना मोठा ‘फायदा’; लवकरच वाढून येईल ‘सॅलरी’

Ahmednagar Hospital Fire | अहमदनगर जिल्हा रुग्णालयात ‘पीएम केअर फंडा’मधील व्हेंटिलेटरमुळे आग भडकली? आमदार रोहित पवारांना संशय

 

Related Posts