IMPIMP

Atul Bhatkhalkar | ‘स्वत: ड्रायव्हिंग करत चेंबूरपर्यंत गेले असते, तर लोटांगण घातलं असतं’

by bali123
atul bhatkhalkar criticised cm uddhav thackeray over pandharpur tour and chembur incident

मुंबई न्यूज (Pune News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) Atul Bhatkhalkar | आषाढी एकादशीनिमित्त (Ashadi Ekadashi) विठ्ठलाची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्या हस्ते भक्तीमय वातावरणात पार पडली. यावेळी चिरंजीव पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे देखील उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुंबईहून पंढरपूरला स्वत: गाडी चालवत गेले. यावरुन भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला आहे. अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी चेंबूर येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ट्विट करुन मुख्यमंत्र्यावर टीका केली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

स्वत: ड्रायव्हिंग करत शनिवारी चेंबूरपर्यंत (Chembur) गेले असते तर लोटांगण घातलं असतं, असे ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे. तसेच याआधी, मुंबईत 25 लोक पावसामुळे मेले तरी मुख्यमंत्री महोदय घर सोडायला तयार नाहीत, हात टेकले यांच्यासमोर…, असे ट्विट करत भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळाला भेट न देण्यावरुन टीका केली होती.

दरम्यान, चेंबूरच्या वाशीनाका (Vashi Naka) परिसरातील डोंगरावर वसलेल्या न्यू भारत नगर या झोपडपट्टीवर भाभा अणुसंशोधन केंद्राची (BARC) संरक्षक भिंत कोसळली. या दुर्घटनेत 19 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 7 जण जखमी झाले. तर दुसरीकडे विक्रोळीतील (Vikhroli) सूर्य नगर येथील पंचशील चाळीतील 6 घरांवर रविवारी पहाटे दर कोसळून 10 जणांचा मृत्यू झाला. तर 5 जण जखमी झाले.
भांडूपमध्ये (Bhandup) घराची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 16 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला.

Web Title :- atul bhatkhalkar criticised cm uddhav thackeray over pandharpur tour and chembur incident

Related Posts