IMPIMP

Atul Bhatkhalkar | ‘वसूली सरकारने या घाणेरड्या खेळाची सुरुवात केली शेवट आम्ही करू’ (व्हिडीओ)

by bali123
Maharashtra Political Crisis | bjp atul bhatkhalkar replied shiv sena chief uddhav thackeray over criticism on union minister home minister amit shah

मुंबई न्यूज (Mumbai News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)Atul Bhatkhalkar | दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन दरम्यान कालपासून (सोमवार) सुरु झालं. त्यात पहिल्याच दिवशी सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले होते. त्यावेळी गोंधळ निर्माण झाला. विधानपरिषदेचे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांना विरोधकांनी आई- बहिणीवरून शिवीगाळ केली. अध्यक्षांच्या समोरील माईक विस्कटणे, राजदंड पळवण्याचा प्रयत्न यावरून भाजपच्या 12 आमदारांना एक वर्षासाठी निलंबन केलं गेलं. या मुद्यावरून आता भाजप आक्रमक झाला आहे. भाजपचे नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ठाकरे सरकार (Thackeray Government) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे.

‘वसूली सरकारने या घाणेरड्या खेळाची सुरुवात केली शेवट आम्ही करू, असा जोरदार हल्लाबोल अतुल भातखळकर यांनी केला आहे. भातखळकर यांनी ट्विटच्या माध्यमातून ठाकरे सरकारवर ताशेरे ओढले आहेत. ‘दोन दिवसीय विधिमंडळ अधिवेशनात काल सोमवारी नियोजित बनाव रचून माझ्यासह भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन करण्यात आले. या दंडेली विरुद्ध कांदिवली पूर्व विधानसभेत संतप्त निदर्शने करण्यात आली. वसूली सरकारने या घाणेरड्या खेळाची सुरुवात केली शेवट आम्ही करू’ असं अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी म्हटलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

अतुल भातखळकर म्हणाले की, ‘ज्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात अर्वाच्च शिवीगाळ केली त्यांनीच माझ्यासह भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन केले. शकुनीने कपटाने फासे टाकलेत, पण जनता उघड्या डोळ्यांनी सर्व काही पाहते. आज लोकांनी रस्त्यावर उरतून वसूली सरकार आणि घरबशा मुख्यमंत्र्यांचा उत्स्फूर्त निषेध केला, असं अतुल भातखळकर यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटलं आहे.

अतुल भातखळकर नंतर भाजपचे आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांनी देखील राज्य सरकारवर टीका करत ट्विट केलं आहे. ‘आम्ही शिवीगाळ केलेली नाही. एक कथा रचून आमचं निलंबन करण्यात आलं. पण ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी आमचा संघर्ष सुरूच राहील. आमदारकी गेली तरी चालेल. पण जनतेच्या प्रश्नांसाठी लढतच राहणार.
12 आमदारांचं निलंबन म्हणजे ठाकरे सरकारची हिटलरशाही, तर,
ओबीसी आरक्षणासाठी लढताना आमचे एक वर्षांसाठी निलंबन झाले,
आम्ही सरकारच्या हिटलर प्रवृत्तीचा निषेध करतो, असं राम सातपुते यांनी म्हटलं आहे.

Web Title : Atul Bhatkhalkar | maharashtra legislative assembly bjp atul bhatkhalkar slams thackeray government over 1 year

Related Posts