IMPIMP

जळगाव महापालिकेत राजकीय भूकंप, भाजपचे 27 नगरसेवक शिवसेनेच्या गळाला

by pranjalishirish
shivsena leader bhaskar jadhav replied bjp over parambir singh letter and sachin vaze case

जळगाव : सरकारसत्ता ऑनलाइन- भाजपच्या BJP ताब्यात असलेल्या जळगाव महापालिकेत महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीला अवघे 4 दिवस शिल्लक असतानाच मोठा राजकीय भूकंप झाला आहे. सत्ताधारी भाजपचे BJP 57 पैकी तब्बल 27 पेक्षा जास्त नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागले आहेत. हे सर्व नगरसेवक रविवारी सायंकाळीच सहलीला रवानाही झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे भाजपचे संकटमोचक माजी मंत्री गिरीश महाजन यांची मोठी अडचण झाली आहे.

जळगाव महापालिकेत भाजपचे BJP स्पष्ट बहुमत आहे. महापौर व उपमहापौरपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ 17 मार्चला संपणार आहे. 18 मार्चला निवडणूक होणार आहे. पण त्यापूर्वीच 27 नगरसेवक शिवसेनेला जाऊन मिळाल्याने सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे भाजपकडून BJP व्हीप बजावण्याआधीच हे नगरसेवक फरार झाले आहेत. शिवसेनेकडून सर्व नगरसेवकांना व्हीप बजावण्यात आला असून, महापौरपदासाठी सेनेच्या जयश्री महाजन यांचे नावदेखील निश्चित केले आहे. रविवारी महाजन कार्यालयात नगरसेवकांची बैठक घेणार होते. मात्र, त्यांना उशीर होत असल्याने स्थळ बदलून विमानतळावरच ही बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Also Read : 

भिवंडी महापालिकेच्या सभागृह नेतेपदी कामिनी पाटील

भाजप आमदाराचे वादग्रस्त विधान, म्हणाले – ‘ताजमहालचे नाव बदलून राम महल करणार’

माजी आमदार संभाजी पवार यांचे निधन

NIA चा मोठा खुलासा ! स्फोटकांनी सापडलेल्या कार प्रकरणात दहशतवादी संघटनांचा संबंध नाही !

Sachin Vaze : मुंबई पोलिस दलातील आणखी काही अधिकारी NIA च्या रडारवर ?

रेखा जरे हत्याकांड प्रकरण : तब्बल 82 दिवसांनंतर मुख्य सुत्रधार बाळ बोठे पोलिसांच्या जाळ्यात

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आता ‘ही’ मोठी जबाबदारी

Related Posts