IMPIMP

‘आदित्यजी, ‘आपल्याला झेपतील अन् समजतील अशाच विषयावर ट्विट करा’; भाजपचा टोला

by Team Deccan Express
Aditya Thackeray | the banner welcoming yuva sena chief aditya thackeray was torn in jalgaon

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे aaditya thackeray यांनी काल (रविवार) कोरोना लसीकरणावरून एक ट्विट केले होते. मात्र, काही वेळातच हे ट्विट डिलिट करण्यात आले. त्यावरून आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. आदित्यजी, ‘आपल्याला झेपतील अन् समजतील अशाच विषयावर ट्विट करा’, असा टोला त्यांनी लगावला.

काँग्रेसचा नवाब मलिकांना टोला, म्हणाले – ‘श्रेय घेण्यासाठी घोषणा करणे योग्य नाही’

देशभरात लसीकरण मोहीम राबवली जात आहे. महाराष्ट्रात याचा काही प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. त्यानंतर यावरून आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले होते. त्यामध्ये आदित्य ठाकरे aaditya thackeray यांनी म्हटले होते, की ‘महाराष्ट्र सरकारने आपल्या नागरिकांना मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय केवळ पर्याय म्हणून नव्हे तर राज्य सरकारचे कर्तव्य म्हणून घेण्यात आला आहे. नागरिकांचे कोरोनापासून संरक्षण करणे ही सरकारची सर्वोच्च जबाबदारी आहे’. मात्र, हे ट्विट काही वेळातच डिलिट करण्यात आले होते.

त्यावरून अतुल भातखळकर यांनी ट्विट केले. भातखळकर यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले, की ‘आपल्याला झेपतील आणि समजतील अशाच विषयावर ट्विट केले, तर ते डिलीट करण्याची नामुष्की ओढवत नाही आदित्यजी…’ तसेच ‘लसीकरणाऐवजी नाईट लाईफ, बार अँड रेस्टॉरंट, पेंग्विन अशा आपल्याला गती असलेल्या विषयावरच ट्विट करावे’, असा टोलाही लगावला आहे.

Also Read :

‘तत्वज्ञान सांगणार्‍या अमोल कोल्हेंनी ते ज्ञानामृत आधी सरकारी तिजोरीतून 400 कोटी खर्चून वडिलांचे स्मारक बांधणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पाजावे’

फडणवीसांवर थेट दिल्लीतून निशाणा; प्रियांका गांधींनी व्हिडिओ ट्विट करून म्हटले…

Coronavirus : देशात गेल्या 24 तासात 3 लाखांच्या जवळपास नवीन रुग्ण, 2 हजाराहून अधिक मृत्यू

धनंजय मुंडेंच्या सामाजिक न्याय विभागाची रेकॉर्डब्रेक कामगिरी, 2003 नंतर पहिल्यांदाच अशी कामगिरी

तेव्हा तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का ? खडसेंच्या लेकीचा संतप्त सवाल

Related Posts