IMPIMP

काँग्रेसचा नवाब मलिकांना टोला, म्हणाले – ‘श्रेय घेण्यासाठी घोषणा करणे योग्य नाही’

by Team Deccan Express
Nawab Malik | NCP leader maharashtra minister nawab malik admitted to jj hospital mumbai he was in ed custody till 3 march

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग पाहता कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवली जात आहे. मात्र, आता ही लस मोफत देण्याची घोषणाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेटमंत्री नवाब मलिक nawab malik यांनी केली होती. त्यानंतर आता काँग्रेस नेते आणि कॅबिनेटमंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. ‘यात श्रेय घेण्यासाठी जी लढाई सुरू आहे, ती योग्य नाही. निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला पाहिजे, असे थोरात म्हणाले.

राज्यात कडक निर्बंध असतानाही गोकूळ निवडणूक प्रचारासाठी गर्दी; राजू शेट्टी म्हणतात…

नवाब मलिक nawab malik यांनी राज्यात मोफत लसीकरणाची घोषणाच करून टाकली होती. त्यावरून बाळासाहेब थोरात यांनी मलिक यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. ते म्हणाले, ‘आमची भूमिका स्पष्ट आहे. सर्वसामान्यांना लस मोफत दिली पाहिजे, असे काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी म्हटले होते. आता त्याबद्दल आम्ही आग्रह धरला आहे. यात श्रेयाची लढाई सुरू आहे ती योग्य नाही. मोफत लसीकरणाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला पाहिजे. याबाबत चर्चा सुरू आहे, श्रेयासाठी घोषणा करणे योग्य नाही’.

Virar Hospital Fire : ‘महाराष्ट्रात कोविड मृत्यूतांडव सुरु, राजेश टोपेंना घरी बसवलं पाहिजे’

तसेच 18 वर्षांवरील सर्वांना 1 मे पासून कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. आता गर्दी वाढण्याची शक्यता आहे. यामध्ये गोंधळ होईल, कोरोना प्रसार वाढेल. मी मुख्य सचिवांबरोबर चर्चा केली आहे. आपलं धोरण ठरवले पाहिजे, केंद्राची जबाबदारी आहे लस उपलब्ध करून देणे. 45 वर्षांवरील नागरिकांना लस देतानाही गोंधळ झाला होता. आता 18 वर्षांवरील नागरिकांना लस देताना धोरण ठरवावे लागेल. त्या संदर्भात दोन दिवसात धोरण निश्चित केले जाईल, असेही थोरात म्हणाले.

Also Read :

‘तत्वज्ञान सांगणार्‍या अमोल कोल्हेंनी ते ज्ञानामृत आधी सरकारी तिजोरीतून 400 कोटी खर्चून वडिलांचे स्मारक बांधणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पाजावे’

फडणवीसांवर थेट दिल्लीतून निशाणा; प्रियांका गांधींनी व्हिडिओ ट्विट करून म्हटले…

Coronavirus : देशात गेल्या 24 तासात 3 लाखांच्या जवळपास नवीन रुग्ण, 2 हजाराहून अधिक मृत्यू

धनंजय मुंडेंच्या सामाजिक न्याय विभागाची रेकॉर्डब्रेक कामगिरी, 2003 नंतर पहिल्यांदाच अशी कामगिरी

तेव्हा तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का ? खडसेंच्या लेकीचा संतप्त सवाल

Related Posts