IMPIMP

चंद्रकांत पाटलांचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना ‘आव्हान’, म्हणाले – ‘GST चे पैसे आले आता विकास करूनच दाखवा’

by sikandershaikh
Chandrakant Patil | bjp leader chandrakant patil says ajit pawar chance to speech from pm modi but he dont talk

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) chandrakant patil | राज्याच्या तिजोरीमध्ये अलबेल अशी परिस्थिती आहे. त्यातच केंद्राकडून येणारे जीएसटीचे पैसे न मिळाल्याने राज्याच्या विकासकामांवर निधीच्या कमतरतेअभावी परिणाम होत असल्याचे राज्य सरकारने वारंवार सांगत केंद्राला धारेवर धरले होते. त्यातच जीएसटीच्या थकबाकीपोटी केंद्रसरकारकडून महाराष्ट्राला २७ हजार कोटी येणे बाकी आहे, त्यामुळे त्याचा परिणाम यंदाचा राज्याच्या अर्थसंकल्पावर होईल असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार नुकताच केला. दरम्यान, केंद्राकडून महाराष्ट्र सरकारला जीएसटीचे ११ हजार ५१९.३१ कोटी रक्कम वितरित केले आहे.

त्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
आपली जबाबदारी जीएसटीच्या थकबाकीचे कारण सांगून केंद्रावर ढकलण्याचे काम नेहमीच महाविकास
आघाडी सरकार करत आहे, त्यातील काही रक्कम आता आली असून महाविकास आघाडी सरकारने ही
रक्कम कोविडच्या उपाययोजना व राज्यातील विकास कामांना गती देण्यासाठी वापरावी व प्रत्येक गोष्टींचे
खापर केंद्र सरकावर फोडणे बंद करावं,’ असं म्हणत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला.

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने गेल्याच आठवड्यात ऑक्टोबर २०२० पासून २८ राज्ये व तीन केंद्र शासित प्रदेशांना जीएसटीच्या पोटी १ लाख कोटी रुपये वितरित केली आहे.
त्यापैकी महाराष्ट्राला मिळालेली जीएसटीची रक्कम ही दुसऱ्या क्रमांकाची आहे.
त्याचप्रमाणे २०१९-२० मध्ये केंद्र सरकारकडून महाराष्ट्र राज्याला सर्वाधिक जी एस टी परताव्याची रक्कम १९ हजार २३३ कोटी देण्यात आल्याचा दावा पाटील यांनी केला आहे.
उपमुखमंत्री अजित पवार नेहमी केंद्र सरकारकडून जीएसटीतील नुकसान भरपाईची रक्कम वेळेवर मिळत नसल्याने राज्यतील विकास कामांवर त्याचा परिणाम होत आहे.
तसेच निसर्ग चक्रीवादळ, अतिवृष्टीसाठीतील नुकसान ग्रस्तांना मदतीसाठी निधी देता येत नाही असा दावा करत होते.
आता निधी मिळाले असल्याचं चंद्रकांत पाटील (chandrakant patil) याची स्पष्ट केलं

संभाजी भिडेंना मोठा धक्का; शिवप्रतिष्ठानमध्ये फूट

Related Posts