IMPIMP

चंद्रकांत पाटील म्हणतात – ‘मुख्यमंत्री गप्प, तोपर्यंत विधानसभा ठप्प’

by pranjalishirish
bjp leader chandrakant patil blame mahavikas aghadi goverments maratha reservation supreme court

मुंबई : Chandrakant Patil | उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ इमारतीबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळली होती. या गाडीचे मालक व्यावसायिक मनसुख हिरेन हे असल्याचे स्पष्ट झाले होते. या प्रकरणी त्यांची चौकशीही सुरू होती. मात्र, याचदरम्यान त्यांचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळला. याच मुद्द्यावरून राजकारण तापले आहे. मुख्यमंत्र्यांनी यावर भाष्य केले नसल्याने विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील Chandrakant Patil यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘जोपर्यंत मुख्यमंत्री गप्प, तोपर्यंत विधानसभा ठप्प’, अशी भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री ठाकरे हे फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधत असतात. त्यावरही पाटील Chandrakant Patil यांनी भाष्य केले. ते म्हणाले, फेसबुक संवाद साधणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गप्प का? पोलीस सेवेतून निलंबित सचिन वाझे ठाकरे सरकारमध्ये पुन्हा पोलीस सेवेत कसे काय आले? धनंजय गावडे हे कुठल्या पक्षाशी संबंधित आहे? वादात सापडलेले सचिन वाझे हे शिवसेनेचे सदस्य आहेत का? असा सवाल त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला.

दरम्यान, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे नाव आल्याने ते सध्या वादाच्या भोवऱ्यात आहेत. त्यांच्यावर कारवाईची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. याच मागणीवरून विरोधकांनी विधानसभेत काल मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला. त्यानंतर आता सचिन वाझे यांची बदली करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

Also Read :

‘मुंबई पोलिसांचे, थोबाड काळे झाले’, पोलिसांबद्दल फडणवीस असं कसं बोलू शकतात ?

नाना पटोलेंचा हल्लाबोल, म्हणाले – ‘ज्वलंत प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपकडून वाझेंना टार्गेट

Gold Rates Today : सणासुदीमध्ये पुन्हा एकदा स्वस्त झालं सोनं-चांदी, 40 हजारांपेक्षा कमी होणार दर ? जाणून घ्या आजचे भाव

Maharashtra Budget 2021 : विरोधक आक्रमक म्हणताहेत; ‘आज त्यांना आम्ही सोडणार नाही’

Related Posts