IMPIMP

Bhandup Fire : आणखी किती जणांच्या मृत्यूने सरकारला जाग येणार, फडणवीसांचा सवाल

by pranjalishirish
TET Exam | BJP leader devendra fadanvis demands cbi enquiry in tet exam case maharashtra cm uddhav thackeray

मुंबई : भांडुपमधील ड्रीम्स मॉलला लागलेल्या आगीत रुग्णालयाला मोठा फटका बसला. हे रुग्णालय आगीच्या भक्ष्यस्थानी होते. या आगीत आत्तापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. या आगीवरून आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. ‘आणखी किती जणांच्या मृत्यूनंतर ठाकरे सरकारला जाग येणार आहे’, असा सवाल विचारला आहे.

Deepali Chavan Suicide Case : चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप, म्हणाल्या – ‘दीपाली वाचली असती ही आत्महत्या नाही तर…

भांडुप येथील आगीची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ‘कोरोना रुग्ण ज्या विभागात होते त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही रुग्णांची सुटका झाली तर काहींची सुटका करण्यासाठी वेळ लागला. त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयाच्या खाली असलेल्या ठिकाणी आग सर्वप्रथम लागली. त्यानंतर ही आग वरपर्यंत पसरत गेली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी या रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर यामध्ये मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

‘महाविकास आघाडीतील नेते राज्यपालांना भेटणार’, अजित पवारांनी सांगितलं

या आगीच्या घटनेनंतर फडणवीस Devendra Fadnavis  यांनी सरकारवर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, ‘जी घटना घडली. त्यामध्ये मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारचा अक्षम्य दुर्लक्षपणा दिसत आहे. या घटनेमुळे लोकं दु:खी असल्याने यावर जास्त बोलता येणार नाही. आणखी किती जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारला जाग येणार आहे?’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Also Read : 

तीरथ सिंहांच्या Ripped Jeans च्या विधानावर स्मृती इराणी भडकल्या, म्हणाल्या – ‘नेत्यांचा कायद्याशी संबंध, लोकांच्या कपड्याशी नाही’

API माधुरी मुंडेसह तिघांवर अ‍ॅन्टी करप्शनची मोठी कारवाई

‘देवेंद्रजी, कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढलाय, आता तुम्हीच शासनाला योग्य ते मार्गदर्शन करा !’

पोलिस बदली रॅकेटचा गुंता आणखी वाढला; आणखी एक नाव समोर, भाजपनेच दिली माहिती

Udit Raj : ‘राष्ट्रपती दलित, पण पंतप्रधान मोदी नमस्कारही घेत नाहीत; दलितांना BJP मध्ये किंमत नाही

काय असतो डाऊन सिंड्रोम? जाणून घ्या या आजाराची कारणे आणि लक्षणे

Mumbai : भांडुपमधील रुग्णालयाच्या आगीची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी ! कारवाईचा इशारा देत म्हणाले…

पुणे पोलिस आयुक्तालयातील 3 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या, लोणीकाळभोर आणि चतुःश्रृंगी ठाण्यांत नवीन पीआयची नियुक्ती

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, काल घेतली होती पत्रकार परिषद

‘देवेंद्रजी, कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढलाय, आता तुम्हीच शासनाला योग्य ते मार्गदर्शन करा !’

Related Posts