IMPIMP

कोरोना वाढत असताना पबमधील पार्ट्यांवरून निलेश राणेंची टीका, म्हणाले – ‘नाईट लाईफच्या नावाखाली पेंग्विन मुंबईची वाटत लावतोय’

by sikandershaikh
bjp leader nilesh rane criticize aditya thackeray night life mumbai

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)Nilesh Rane | राज्यातील कोरोना (COVID-19) बाधितांचा आकडा वाढत आहे. अशात राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीत एका पबमध्ये सुरू असलेल्या पार्टीचा व्हिडीओ शेअर करत मनसेनं (Maharashtra Navnirman Sena – MNS) मुंबईमध्ये कोरोनाच्या नियमावलीचं उल्लंघन केलं जात आहे असं समोर आणून दिलं. यानंतर आता भाजप सचिव निलेश राणे (Nilesh Rane) यांनी यावर भाष्य करत आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.

निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ट्विट करत आपलं म्हणणं मांडलं आहे. आपल्या ट्विटमध्ये ते लिहितात, आदित्य ठाकरे जिथून निवडून आले आहेत त्या वरळी भागात पब, दारू आणि धिंगाणा जोरात सुरू आहे. मुख्यमंत्र्यांना स्वत:च्या मुलाच्या मतदारसंघात कोरोना दिसत नाही. नाईट लाईफच्या नावाखाली पेंग्विन मुंबईची वाटत लावतोय तर दुसऱ्या बाजूला ह्यांचेच मित्र हा क्लब चालवतात अशी बोचरी टीका राणेंनी केली आहे.

मनसेचे नेते संतोष धुरी यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. वरळीतील पबमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन सुरू आहे असं त्यांनी समोर आणलं आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून धुरी यांनी शिवसेना नेते आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले संतोष धुरी ?

आपल्या पोस्टमध्ये संतोष धुरी यांनी लिहिलं की, मुख्यमंत्री ठाकरे पत्रकार परिषद घेत कोरोना संपला नसल्याचं सांगत आहेत.
परंतु वरळीतील कमला मीलमध्ये 12 वाजून गेल्यानंतरही पब सुरू आहे.
इतर ठिकाणी 11 वाजता पब बंद होतात.
मग वरळीतील पब रात्री 12-1 पर्यंत कसे सुरू असतात.
यांना कोण परवानगी देतं ? असा सवाल देखील धुरी यांनी केला आहे.

वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर मंत्रिपदासाठी ‘या’ आमदारांच्या नावाची चर्चा !

Related Posts