IMPIMP

महाविकास आघाडी सरकार म्हणजे राज्यातील जनतेला त्रास झाला आहे, भाजप नेत्याचा हल्लाबोल

by pranjalishirish
bjp-leader-nitesh-rane-slams-maha-vikas-aghadi-govt-over-mpsc-exam

सिंधुदुर्ग : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 14 मार्च रोजी होणारी एमपीएससी MPSC  परीक्षा रद्द केल्याची घोषणा गुरुवारी केली. सरकारच्या या निर्णयानंतर पुण्यात विद्यार्थी रस्त्यावर उतरले. पुण्यात विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले. राज्यातील विविध जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून सरकारच्या निर्णयाचा निषेध केला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून परीक्षा रद्द करणार नसल्याचे आश्वासन दिले. आज एमपीएससीने नवीन परिपत्रक कढून एमपीएससीची MPSC 14 मार्च रोजी होणारी परीक्षा 21 मार्च रोजी होणार असल्याचे जाहीर केले.

यातच भाजपचे नेते नीतेश राणे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला असून, या सरकारचा राज्यातील जनतेला त्रास झाला आहे, अशी टीका केली.

भाजप आमदार नीतेश राणे यांनी एमपीएससीच्या MPSC  गोंधळावरून सरकारवर निशाणा साधला आहे. नीतेश राणे म्हणाले, एमपीएससीला परीक्षा पुढे ढकलायच्या होत्या तर मग हॉलतिकीट कशाला काढायची ? विद्यार्थ्यांचे जे नुकसान झाले आहे ते सरकार भरून देणार आहे का ? असा सवाल राणे यांनी उपस्थित केला आहे. परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले असून, याची नुकसानभरपाई सरकारने दिली पाहिजे, अशी मागणी नीतेश राणे यांनी केली आहे.

टेंडर पास करताना या लोकांचा ताळमेळ चांगला

महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना नीतेश राणे म्हणाले, जेव्हा भ्रष्टाचार कारायचा असतो, एखादे टेंडर पास करायचे असते, त्यावेळी सरकारमधील लोकांमध्ये चांगला ताळमेळ असतो. विद्यार्थ्यांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे हे सरकार म्हणजे राज्यातील जनतेला त्रास झाला आहे, अशी टीका राणे यांनी केली आहे.

सचिन वाझेंची चौकशी झाली पाहिजे

मनसुख हिरेन प्रकरणावर भाष्य करताना नीतेश राणे यांनी म्हटले की, अँटिलियाच्या बाहेर नेमके काय झाले हे खरोखर जाणून घ्यायचे असले तर सचिन
वाझे यांची चौकशी झाली पाहिजे. हे प्रकरण अतिरेकी प्रकरण असून, सचिन वाझे यांना अटक झाली पाहिजे, अशी मागणी करत त्यांनी खंडणीचा विषय बाहेर आलाच पाहिजे, अशी मागणी नीतेश राणे यांनी केली आहे.

Alos Read :

वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझेंची नागरी सुविधा केंद्रात बदली

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी ATS चे ‘क्राइम सीन’ प्रात्याक्षिक

MPSC Exam Postpond : अजित पवारांनी मांडलं स्पष्ट मत; म्हणाले – ‘MPSC प्रकरण हाताळण्यात कमी पडलं’

21 तारखेला परीक्षा न झाल्यास पुन्हा आंदोलन करणार; गोपीचंद पडळकरांचा राज्य सरकारला इशारा

Birthday SPL : ‘या’ शोमुळं बदललं होतं ‘सिंगर’ श्रेया घोषालचं आयुष्य ! 6 वर्षांनंतर होतेय आई

Related Posts