IMPIMP

Pravin Darekar : ‘कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?’ केंद्राने राज्यात लक्ष घालावे

by bali123
bjp leader pravin darekar slams thackeray govt over corona situation maharashtra

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा कहर वाढत आहे. राज्यातील अनेक ठिकाणी पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले आहे. याला सर्वस्वी मुख्यमंत्री आणि राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे. तसेच केंद्राने राज्यात लक्ष घालावे, अशी मागणी भाजप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर pravin darekar यांनी केली आहे.

‘हा काळ फालतू राजकारण करण्याचा नाही, लोकांचे प्राण वाचवण्यासाठी हातात हात घालून काम करणं गरजेचं; कोरोना कुणालाही सोडत नाही’

पत्रकार परिषदेत कोरोना संदर्भात रोखठोक भाष्य करताना प्रवीण दरेकर म्हणाले, राज्याच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले असताना पुन्हा लॉकडाऊन करुन सर्वसामान्य लोकांचे हाल होण्याची वाट सरकार पहात आहे का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर कोरोना, लॉकडाऊन या मुद्यांवरुन निशाणा साधला. भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत प्रवीण दरेकर pravin darekar बोलत होते.

निवडणुकीच्या भीतीमुळे मोदी-शहा सरकारने निर्णय बदलला’, PPF वरील व्याजदर जैसे थे !

5 हजार जमा करा अन् टाळेबंदी करा
राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला लॉकडाऊन करायचा असेल, तर राज्य सरकारने सर्व क्षेत्रातील कष्टकऱ्यांच्या खात्यात, परीक्षा देणारे तरुण, लहान व्यावसायिक, कष्टकरी, संघटित व असंघटित कामगारांच्या खात्यामध्ये पाच हजार रुपये जमा कारावेत. पैसे जमा केल्यानंतर राज्य सरकारने राज्यात टाळेबंदी करावी, अशी मागणी दरेकर यांनी यावेळी केली.

खा. उदयनराजे आणि आ. शिवेंद्रराजे यांच्यात कास धरणाच्या निधीवरून ‘श्रेय’ वाद, जाणून घ्या नेमकं प्रकरण

राज्याचा ढिसाळ कारभार
राज्यातील सर्वसामान्य जनता वाऱ्यावर पडल्याचे पहायला मिळत आहे. देशाच्या तुलनेत राज्याचा ढिसाळ कारभार सुरु आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात राज्यातील महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याची टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

सरकार व प्रशासन झोपेत, जागेच होत नाही
नाशिकमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णांना बेड मिळत नाहीत. बेड मिळत नसल्याने ऑक्सिजन सिलेंडरसह आंदोलन करणाऱ्या रुग्णाचा मृत्यू झाला. रुग्णाच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या अधिकारी आणि सरकारविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जावा, अशी मागणी प्रविण दरेकर यांनी केली. नाशिकच्या दौऱ्यादरम्यान आयुक्तांची भेट घेऊन बेड्स, व्हेंटीलेटर याची माहिती घेतली. त्यावेळी बेड्स, व्हेंटीलेटर उपलब्ध नसल्याची माहिती मिळाली. दौऱ्यावरुन परतल्यानंतर मुख्यमंत्र्यांना याची कल्पना दिली होती. पण हे सरकार आणि प्रशासन झोपेत असून ते जागेच होत नाही, अशा शब्दात दरेकरांनी सरकारवर हल्लाबोल केला.


केंद्राने राज्यात लक्ष घालावे
कोरोना काळात केंद्र सरकारने अनेक उपाययोजना केल्या. सर्वसामान्यांना मदत केली. त्यामुळे देश पातळीवर केंद्र सरकार कोरोना रोखण्यात यशस्वी ठरल्याचा दावा दरेकर यांनी केला आहे. केंद्राने राज्याला दिलेल्या व्हेंटीलेटरपैकी 400 व्हेंटीलेटर प्रशिक्षित तंत्रज्ञ नसल्याने धूळ खात पडून आहेत. केंद्र सरकारच्या आरोग्य विभाग, गृह विभागाला आमची विनंती आहे की, त्यांनी राज्यात लक्ष घालावे आणि कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली.

Also Read:

भाजपचं पित्त का खवळतंय ?, शरद पवार-अमित शहांच्या गुप्त भेटीवरुन शिवसेनेचे शरसंधान

शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर ! संजय राऊत यांच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

‘महाविकास आघाडीला पुढील 25 वर्षे धोका नाही !’

पवार-शाह गुप्त बैठक ! ‘चंद्रकांत पाटील वगैरे नेते पतंगाच्या मांजावरून एवढे वर गेले की… “

‘जितेंद्र आव्हाड यांचे CDR आणि SDR जतन करा’, हायकोर्टाचे पोलिसांचा आदेश

लष्कर पेपर लिक प्रकरण : मेजर थिरु थंगवेल याला 25 लाख रुपयांच्या बदल्यात लष्कराचा पेपर पाठविला

‘आधी बुडणार्‍या रोजगाराचे पैसे बँक अकाऊंटमध्ये जमा करा, नंतरच Lockdown लावा’

‘केवळ RSS वाले तेवढे देशभक्त आणि बाकी सगळे देशद्रोही बनलेत’

एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात ED च्या कारवाईबद्दल दिली खळबळजनक माहिती, म्हणाले..

परमबीर सिंह यांच्या आरोपांची होणार चौकशी, निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीची घोषणा

भाजप नेत्यांकडून ठाकरे सरकारवर टीका; म्हणाले – ‘सोडलेल्या हिंदुत्वाचे आणि कोत्या मनाचे पुन्हा एकदा दर्शन, फक्त आयत्या पिठावर रेघोट्या मारणाऱ्यांची नावं’

Related Posts