IMPIMP

BJP MLA Atul Bhatkhalkar | ‘मुंबईत पावसामुळे लोक मेले तरी मुख्यमंत्री घर सोडायला तयार नाहीत’, भाजपचा हल्लाबोल

by bali123
BJP MLA Atul Bhatkhalkar | bjp atul bhatkhalkar on maharashtra cm uddhav thackeray mumbai rain

मुंबई न्यूज (Mumbai News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) BJP MLA Atul Bhatkhalkar | हवामानाच्या अंदाजानुसार मुंबईत (Mumbai) मागील काही दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. पण शनिवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे मुंबईत विविध घटना घडल्या. त्या विविध दुर्घटनेत तब्बल 33 लोकांचा मृत्यू झाला आहे. दरड आणि भिंत कोसळून 21 जणांनी आपला प्राण गमावला आहे. उर्वरित विविध दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. अशा पद्धतीचा मुंबईसह राज्यात आलेल्या संकटाचा आणि परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आढावा घेत प्रशासनाला अनेक सूचना दिल्या. उद्धव ठाकरेंच्या या विधानावरून भाजपचे आमदार अतुल भातखळकर (BJP MLA Atul Bhatkhalkar) यांनी थेट निशाणा साधला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

मुंबईतील या घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी जाऊन भेट न देण्यावरुन भाजपा आमदार अतुल भातखळकर आता आक्रमक झाले आहेत. अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. मुंबईत 25 लोक पावसामुळे मेले तरी मुख्यमंत्री महोदय घर सोडायला तयार नाहीत, हात टेकले यांच्यासमोर.. अशी घणाघाती टीका भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ट्वीटच्या माध्यमातून केली आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

‘मुंबई महानगरपालिका (Mumbai Municipal Corporation) आणि अन्य सर्व यंत्रणांनी अपेक्षित तसेच अनपेक्षित आपत्तींचा सामना करण्यासाठी दक्ष राहावे आणि दरडग्रस्त भाग आणि मोडकळीस आलेल्या अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांना खबरदारी म्हणून सुरक्षितस्थळी हलवा,
असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी प्रशासनाला दिला आहे.
मुख्यतः, दरडी कोसळू शकतात अशा ठिकाणी पालिकेचे लक्ष असले तरी अनपेक्षित दुर्घटना घडणार नाही याची काळजी घ्या.
चेंबूर, विक्रोळी येथील दुर्घटनेत संरक्षक भिंतीच्या वरून मागील टेकडीचा भाग घरांवर पडल्याने मोठ्या प्रमाणावर ढिगारा पसरून प्राणहानी झाली ही गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे.

उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांच्या मनोऱ्यांखाली मोठय़ा प्रमाणावर वस्त्या आहेत,
त्याबाबतही वीज कंपन्यांना तातडीने सावध करावे,
काही ठिकाणी भूमिगत वाहनतळांमध्ये पाणी घुसले व वाहनांचे नुकसान झाले व भांडुप येथे जल
शुद्धीकरण केंद्रच बंद पडल्याचे लक्षात घेता यंत्रणांनी अधिक सावधगिरी बाळगण्याची व समन्वयाने काम
करण्याची गरज असल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटलं.

Web Title :- BJP MLA Atul Bhatkhalkar | bjp atul bhatkhalkar on maharashtra cm uddhav thackeray mumbai rain

Related Posts

Leave a Comment