IMPIMP

चंद्रकांत पाटलांनी घेतली अजित पवारांची भेट; केली ‘ही’ मागणी

by bali123
bjp mla chandrkant patil meets deputy cm ajit pawar over pune lockdown

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील chandrkant patil यांनी आज (शुक्रवार) उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे इतर नेतेही उपस्थित होते. चंद्रकांत पाटील chandrkant patil यांनी अजित पवार यांची भेट घेऊन अनेक मुद्यांवर चर्चा केली. तसेच बँकेतील कर्मचारी आणि पत्रकार यांना कोविड योद्धा मानून त्यांच्यासाठी कोरोना लसीकरणाची व्यवस्था करावी, अशी मागणी चंद्रकांत पाटील chandrkant patil यांनी अजित पवार यांच्याकडे केली.

मागील काही दिवसांपासून पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज अजित पवार यांनी आढावा बैठकीचे आयोजन केले आहे. तसेच वाढत्या रुग्ण संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. याशिवाय काही निर्णय झाले असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. या बैठकीपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांची भेट घेतली आहे.

या भेटीदरम्यान चंद्रकांत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये पुण्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांबाबत चर्चा झाली. तसेच पुण्यातील लॉकडाउन संदर्भातदेखील यावेळी चर्चा झाली. यावेळी लॉकडाउन संदर्भात चंद्रकांत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

या भेटीदरम्यान चंद्रकांत पाटील यांनी काही मागण्या केल्या आहेत. पावसाळ्यात नाल्यांना पूर येऊन मोठे नुकसान होते. त्यामुळे नाल्यांच्या दुरुस्तीची कामे करणे गरजेचे आहे. मात्र, भाजपच्या ताब्यात असलेल्या पालिकेकडे पुरेसा निधी उपलब्ध नाही. त्यामुळे राज्य सरकारने नालेदुरुस्तीसाठी तीनशे कोटी रुपयांचा निधी पुणे महानगरपालिकेला उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांच्याकडे केली आहे.

Mukesh Ambani Bomb Scare : तिहार जेलमधील दहशतवादी तहसीन अख्तरकडून मोबाईल हस्तगत

वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझेंची नागरी सुविधा केंद्रात बदली

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी ATS चे ‘क्राइम सीन’ प्रात्याक्षिक

Related Posts