IMPIMP

‘अजित पवार तुम्ही उपमुख्यमंत्री आहात, नाही तर…’ निलेश राणेंचा थेट ‘निशाणा’

by Team Deccan Express
Nilesh Rane On Ajit Pawar | bjp leader nilesh rane slams ncp leader and finance minister ajit pawar over gst

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात कोरोनामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. तर कोरोनावरुन राजकारण तापू लागले असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणे nilesh rane यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. निलेश राणे nilesh rane यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर ट्विट करुन अजित पवार यांना लक्ष्य केले आहे. पवार साहेब, ज्या दिवशी उपमुख्यमंत्रीपद जाईल त्या दिवशी आमदार सोडा नारळपाणी विकणारा पण तुमच्याकडे येणार नाही, असे निलेश राणे nilesh rane यांनी म्हटले आहे.

… म्हणून ह्या घटनांमधून काही बोध घ्यायचाच नाही असं नाही, राज ठाकरेंचा सरकारला सल्ला

चंद्रकांत पाटील यांच्या आरोपांचा समाचार घेताना अजित पवार म्हणाले होते, मी दररोज सकाळी सात वाजल्यापासून प्रत्यक्ष भेटींना उपलब्ध असतो, मुख्यमंत्री, मंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासोबत दिवसभर संपर्कात असतो. तसेच भाजपचे आजी माजी आमदार, नेते मंडळी भेटत असतात. ते देखील मला दिवसभर फोन करतात, असे अजित पवार म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन निलेश राणे यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले निलेश राणे ?
भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे nilesh rane यांनी आज (शुक्रवार) सकाळी ट्विट करुन अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. निलेश राणे म्हणाले, अजित पवार म्हणतात माझ्याकडे किती भाजपचे आमदार येतात ते पहा. पवार साहेब, ते तुमच्याकडे नाही तर उपमुख्यमंत्र्यांकडे येतात. ज्या दिवशी उपमुख्यमंत्रीपद जाईल, त्या दिवशी आमदार सोडा नारळपाणी विकणारा पण येणार नाही तुमच्याकडे. तुम्ही उपमुख्यमंत्री आहात. विचार करुन बोललं पाहिजे, असे निलेश राणे nilesh rane म्हणाले.

Also Read :

‘तत्वज्ञान सांगणार्‍या अमोल कोल्हेंनी ते ज्ञानामृत आधी सरकारी तिजोरीतून 400 कोटी खर्चून वडिलांचे स्मारक बांधणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पाजावे’

फडणवीसांवर थेट दिल्लीतून निशाणा; प्रियांका गांधींनी व्हिडिओ ट्विट करून म्हटले…

Coronavirus : देशात गेल्या 24 तासात 3 लाखांच्या जवळपास नवीन रुग्ण, 2 हजाराहून अधिक मृत्यू

धनंजय मुंडेंच्या सामाजिक न्याय विभागाची रेकॉर्डब्रेक कामगिरी, 2003 नंतर पहिल्यांदाच अशी कामगिरी

तेव्हा तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का ? खडसेंच्या लेकीचा संतप्त सवाल

Related Posts