IMPIMP

… म्हणून ह्या घटनांमधून काही बोध घ्यायचाच नाही असं नाही, राज ठाकरेंचा सरकारला सल्ला

by Team Deccan Express
mns chief raj thackeray reaction on virar covid hospital fire

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – नाशिकमधील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेनंतर आज विरार येथील कोविड रुग्णालयाला लागलेल्या आगीत 13 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला मध्यरात्रीनंतर आग लागली होती. चार मजली असणाऱ्या रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. यावेळी अतिदक्षता विभागात 17 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत होते. त्यापैकी 13 रुग्णांचा या आगीत मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे. अनेक नेत्यांनी या घटेनबाबत दु:ख व्यक्त केले आहे. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे raj thackeray यांनी या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करुन सरकारला एक महत्त्वाचा सल्लाही दिला आहे.

Social Media Reactions : ‘मुख्यमंत्री साहेब, 2 तासात तुम्ही तुमच्या मुलाचं लग्न लावून दाखवा’


विरारमधील आगीच्या दुर्घटनेवर राज ठाकरे raj thackeray यांनी ट्विट केले आहे. आज विरारमधील हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. परवा नाशिक मधील घटना असो की काही दिवसांपूर्वीची भंडारा आणि भांडूप मधील घटना असोत. ह्या घटना दुर्दैवी आणि क्लेशदायी आहेत. सध्याच्या परिस्थितीत सरकारी यंत्रणांवर ताण आहे हे मान्य आहे. पण म्हणून ह्या घटनांमधून काही बोध घेयचाच नाही असं नाही, अशी उद्विग्नता राज ठाकरे raj thackeray यांनी व्यक्त केली.

ठाकरे सरकारने तातडीने जबाबदार अधिकाऱ्यांच्या टीम्स तयार करुन, प्रत्येक रुग्णालयातील व्यवस्थांचं, अग्निसुरक्षा यंत्रणांचं तात्काळ ऑडिट करून घ्यायला हवं. आणि ज्या त्रुटी आढळतील त्यावर उपाययोजना केल्या पाहिजेत, असा सल्लाही त्यांनी ट्विटच्या माध्यमातून ठाकरे सरकारला दिला आहे.

Also Read :

‘तत्वज्ञान सांगणार्‍या अमोल कोल्हेंनी ते ज्ञानामृत आधी सरकारी तिजोरीतून 400 कोटी खर्चून वडिलांचे स्मारक बांधणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पाजावे’

फडणवीसांवर थेट दिल्लीतून निशाणा; प्रियांका गांधींनी व्हिडिओ ट्विट करून म्हटले…

Coronavirus : देशात गेल्या 24 तासात 3 लाखांच्या जवळपास नवीन रुग्ण, 2 हजाराहून अधिक मृत्यू

धनंजय मुंडेंच्या सामाजिक न्याय विभागाची रेकॉर्डब्रेक कामगिरी, 2003 नंतर पहिल्यांदाच अशी कामगिरी

तेव्हा तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का ? खडसेंच्या लेकीचा संतप्त सवाल

Related Posts