IMPIMP

‘ठाकरे सरकारची अवस्था, गिर गया तो भी टांग उपर’ अशी, भाजपचा टोला (व्हिडीओ)

by pranjalishirish
bjp pravin darekar troll uddhav thackeray shivsena ncp congress sanjay raut

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- देशामध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. त्यामध्ये बहुतांश रुग्णसंख्या ही महाराष्ट्रातील आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. लवकरच राज्यात कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन लावण्याचा विचार सरकार करत आहे. परंतु केंद्र सरकारकडून सातत्याने महाराष्ट्राला टिकेचे लक्ष्य केले जात आहे. लसीकरण मोहिमेला महाराष्ट्रात खोडा घातला गेला असे सुरुवातील केंद्रीय मंत्र्यांनी म्हटले. तर काल केंद्रीय आरोग्य सचिवांनी पंजाब, छत्तासगड, महाराष्ट्र या राज्यांना कोरोना रोखण्याच्या मुद्यावरुन सवाल केले आहेत. हे ठाकरे सरकारला रुचले नसल्याने त्यांनी केंद्र सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. यावरुन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर Pravin Darekar  यांनी ठाकरे सरकारचा समाचार घेतला आहे.

Nitesh Rane : ‘सरकारने कुठलाही त्रास दिला तर संघर्ष अटळ

प्रविण दरेकर Pravin Darekar  यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत राज्यातील ठाकरे सरकारवर टीका केली आहे. दरेकर म्हणाले, ठाकरे सरकारची अवस्था किंवा जिथे कोरोनावर नियंत्रण मिळवता आलेलं नाही अशा राज्यांची अवस्था गिर गया तो भी टांग उपर अशी झाली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव भूषण यांनी पथकांचे निरीक्षण सांगितले आहे. राज्यामध्ये वैद्यकीय स्तरावर कोठे कमतरता आहे ? नियोजनात किंवा समन्वयात काय त्रुटी आहेत ? हे त्या पथकाने सांगितले आहे. पथकाने केलेल्या निरिक्षणाकडे सकारात्मकतेने पाहून योजनांमध्ये सुधारणा करणे महत्त्वाचे आहे. मात्र, त्याऐवजी केंद्र सरकारला दोष देण्याचे काम सत्ताधारी नेत्यांकडून केले जात आहे. राज्यात वाढणाऱ्या कोरोना रोखण्यात अपयश आल्याने हे तीन राज्य सगळी जबाबदारी केंद्रावर ढकलण्याचे काम करत आहेत, असे मत दरेकर यांनी व्यक्त केले आहे.

‘महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री नाही याची किंमत जनतेने का मोजावी ?’

‘महाराष्ट्रात लोकशाहीऐवजी ‘लॉक’शाही, फडणवीसांचा टोला

पथकाने काय नोंदवले निरीक्षण…

केंद्रीय आरोग्य सचिवांनी पंजाब, छत्तीसगड आणि महाराष्ट्राला पत्र लिहिले आहे. राज्यामध्ये तैनात करण्यात आलेल्या केंद्रीय पथकाने दिलेल्या निरीक्षण अहवालावरुन सचिवांनी राज्यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात टेस्टिंग, कॉन्ट्रॅक्ट टेस्टींग, कंटेन्मेंट मोहीम, हॉस्पिटमधील पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेवरुन प्रश्न उपस्थित केले. या तिन्ही राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यांत वेगवेगळ्या समस्या आहेत. काही ठिकाणी कंटेन्मेंट झोनवरुन प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर काही ठिकाणी पायाभूत सुविधांचा अभाव असल्याचं म्हटलं आहे. राज्यात असलेल्या त्रुटींबाबत आणि कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी केंद्र सरकारने हे पत्र राज्यांना लिहिले आहे. कोरोनाचा संसर्ग ज्या राज्यात सर्वाधिक आहे त्या राज्यांमध्ये 50 केंद्रीय आरोग्य पथकं तैनात केली आहेत.

Read More : 

..हे तर ‘महावसूली’ सरकार अन् ‘जिथं जाऊ तिथं खाऊ’ ही मंत्र्यांची कामे : फडणवीस

‘महाराष्ट्रात लोकशाहीऐवजी ‘लॉक’शाही, फडणवीसांचा टोला

…तर मग रोहित पवारांवर गुन्हा दाखल करणार का ?, भाजपचा सवाल

‘हा’ केंद्र सरकारचा अमानुषपणा आहे, संजय राऊतांचा केंद्र सरकारवर घणाघात

पंढरपूर : देवेंद्र फडणवीस आक्रमक, म्हणाले – ‘…तर माझं नाव बदलून टाका’ (Video)

भिडेंच्या वक्तव्याची चौकशी करुन कारवाई करणार, जयंत पाटलांचा इशारा

जयंत पाटलांनी घेतला संभाजी भिडेंच्या ‘त्या’ वक्तव्याचा समाचार, सर्वत्र जोरदार चर्चा

सचिन वाझे प्रकरणावरुनही उदयनराजे आक्रमक, म्हणाले, ‘हा कोण वाझे…’

संजय राऊतांनी फडणवीसांना दिला सल्ला, म्हणाले – ‘प्रसंग बाका, सरकार कोणाचं हे पाहू नका, दिल्लीतून महाराष्ट्राला मदत मिळवून द्या’

15 लाखांची लाच घेताना आयकर विभागातील 2 अधिकारी CBI च्या जाळ्यात

Related Posts