IMPIMP

Chandrakant patil : ‘केंद्रीय आरोग्य मंत्र्यानी ठोक ठोक ठोकलंय’

by pranjalishirish
chandrakant patil union health minister slammed chandrakant patils government vaccination

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- राज्यात तीन दिवस पुरतील एवढेच लसीचे डोस शिल्लक आहेत. त्यामुळे केंद्राकडे लसींचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे. दर आठवड्याला 40 लाख लसींचा पुरवठा करण्याची केंद्राकडे मागणी केली आहे. राज्यात सध्या 14 लाख लसींचे डोस शिल्लक असून ते तीन दिवस पुरतील. त्यामुळे लसीकरण बंद पडण्याची भीती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली होती. यावर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी महाराष्ट्र सरकारमुळे अख्ख्या देशाच्या कोरोनाविरोधी लढ्याला फटका बसल्याचं सांगत ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या टीकेनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील Chandrakant patil यांनी ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

माझे मौन हे कुणी कमजोरी समजू नये’, दवेंद्र फडणवीस सरकारवर कडाडले

सरकारकडून संघटीत गुन्हेगारी आहे

चंद्रकांत पाटील Chandrakant patil यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल करताना म्हटले की, आठवीतल्या विद्यार्थ्यांनाही समजते की अनिल परब हे गृह खात्यात लुटबूड करत होते. यावर शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती. अनिल परब यांनी विधानसभेत सचिन वाझे प्रकरणात विशेश लक्ष घातले होते. यावरुन कोणाच्याही लक्षात येईल. सध्याच्या परिस्थितीवरुन सामान्य माणसाला वीट आला असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. राज्य सरकार ही संघटीत गुन्हेगारी होत असून जो सर्वसामान्यांना न्याय आहे तोच इथे लावावा, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी याप्रकरणी मोक्का लावला जावा अशी मागणी केली आहे.

‘खंडणीचे आरोप निराधार, माझी नार्को टेस्ट करा’ ! परब यांचे आव्हान

तर केंद्राकडे राज्य चालवायला द्या

लसीकरणाच्या मुद्यावरुन चंद्रकांत पाटील Chandrakant patil यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले लसीकरणाच्या मुद्यावरुन केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी राज्य सरकारला ठोक ठोक ठोकलंय.त्यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली आहे. महाराष्ट्रात इंजेक्शन मिळत नाही, लसीकरणासाठी तुमचा योग्य कारभार नाही. प्रत्येक गोष्टीत सरकार केंद्र सरकारला दोष देणार असाल तर केंद्राकडे राज्य चालवायला द्या, असा टोला पाटील यांनी लगावला आहे.

‘राज्यात कठोर निर्बंध आवश्यक’, शरद पवारांनी जनतेला केले ‘हे’ आवाहन (व्हिडीओ)

काँग्रेसचा डॉ. हर्षवर्धन यांच्यावर पलटवार

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी महाराष्ट्र सरकारवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना महाराष्ट्र काँग्रेसने पलटवार केला आहे. काँग्रेसने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन प्रत्युत्तर दिले आहे. शेवटी आज केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचा तथा मोदी सरकारचा महाराष्ट्रद्रोही चेहरा समोर आलाच ! अपेक्षेप्रमाणे आणि आजवरच्या कारकिर्दीप्रमाणे त्यांनी आपल्या नियोजनशून्य कारभाराचे खापर राज्यांच्या खासकरुन बिगर भाजपशासित राज्यांच्या माथी फोडण्यास सुरुवात केली आहे, असा पलटवार महाराष्ट्र काँग्रेसने केला आहे.

Read More : 

चित्रा वाघ-रुपाली चाकणकर यांच्यात रंगला ‘कलगीतुरा’ !

परमबीर सिंग NIA च्या कार्यालयात ! सचिन वाझे, अँटिलिया प्रकरणी जबाब नोंदवणार

‘मुख्यमंत्र्यांचे मंत्र्यांवर नियंत्रण नाही, आता राजीनाम्यासाठी रांग लागेल’, केंद्रीय मंत्र्याचा दावा

‘त्या’ वक्तव्यावरुन संजय निरुपम यांचा राज ठाकरेंना टोला, म्हणाले -‘बहिरा नाचे आपन ताल…’

‘खा. प्रताप पाटील-चिखलीकरांची माणसे निवडून देऊ नका, भाजप आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल’; भाजपमधील गटबाजी उघड

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज शरद पवारांची भेट घेणार

पंढरपूर पोटनिवडणुकीतील भाजपचे ‘स्टार’ प्रचारक कोरोनाबाधित

आ. शिवेंद्रराजे यांचा ठाकरे सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘Lockdown लावून प्रशासनाकडून मोगलाई’

Coronavirus : न्यूझीलंडने भारताबाबत घेतला मोठा निर्णय, 28 एप्रिलपर्यंत ‘नो एंट्री’

Chitra Wagh : ‘ही मंडळी भ्याडच म्हणावी लागतील’

सचिन वाझेंच्या पत्रावरून फडणवीस म्हणाले; ‘पत्र गंभीर…’

Related Posts