IMPIMP

मोदींना 1971 मध्ये कोणत्या कायद्याखाली अटक झाली ? ते कोणत्या तुरुंगात होते? RTI दाखल

by pranjalishirish
congress leader saral patel filed rti and demand information of pm modi bangladesh satyagraha statement

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi हे सध्या बांगलादेशच्या दौऱ्यावर आहेत. ‘बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला होता. त्यावेळी मला अटक झाली होती. मी तुरुंगवासही भोगला होता’, असे ते म्हणाले होते. त्यावरून आता काँग्रेसकडून थेट माहिती अधिकारांतर्गत मोदींच्या दाव्याची माहिती मागवण्यात आली आहे.

शशी थरूर यांनी मागितली PM नरेंद्र मोदींची माफी

गुजरात काँग्रेसचे सोशल मीडिया नॅशनल कनव्हेअर सरल पटेल यांनी माहिती अधिकारात माहिती मागवली आहे. त्यांनी RTI कडे माहिती मागितल्याचे ट्विट करून सांगितले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की ‘पंतप्रधान कार्यालयाकडून मोदींनी बांगलादेश दौऱ्यादरम्यान केलेल्या दाव्याबाबत अधिक माहिती मागवणार RTI अर्ज केला आहे. कोणत्या कायद्यांतर्गत मोदींना Narendra Modi अटक झाली. त्यांना कोणत्या तुरुंगात ठेवण्यात आले. यासंदर्भात अधिक जाणून घेण्याची उत्सुकता आहे’.

वाहनधारकांना दिलासा ! ड्रायव्हिंग लायसन्स, RC वैधतेबाबत केंद्राची महत्वपूर्ण घोषणा

काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी ?

‘आपण बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला होता. मी तेव्हा 20 ते 22 वर्षांचा असेन. ते माझे पहिलेच आंदोलन होते. त्यावेळी मला अटक झाली होती. मी तुरुंगवासही भोगला होता’.

अश्लील व्हिडीओ प्रकरणी भाजपचे माजी मंत्री अडचणीत ! तरुणीच्या तक्रारीनंतर FIR दाखल

थरूर यांच्याकडून ट्विट

काँग्रेस नेते शशी थरूर यांनीही मोदींच्या Narendra Modi या दाव्यानंतर ट्विट करत सवाल केला होता. आंतरराष्ट्रीय शिक्षण…आपले पंतप्रधान भारतीय फेक न्यूजचा आस्वाद बांगलादेशला देत आहेत. सगळ्यांनाच माहिती आहे की बांगलादेशला कोणी स्वातंत्र्य मिळवून दिले, असे ट्विट करत टीका केली होती. मात्र, त्यांना त्यांची चूक लक्षात येताच याप्रकरणात माफीही मागितली.

Also Read

भाजपच्या सर्व आरोपांना उत्तर देत काँग्रेसनं विचारला प्रश्न – ‘…मग फडणवीसांनी 6.3 GB चा कोणता पेनड्राईव्ह दाखवला?’

होय, दीपाली चव्हाणांना वाईट वागणूक मिळत होती, वन्यजीव रक्षकाचा दावा

Gold Rates Today : सोन्या चांदीच्या दरात पुन्हा घसरण, जाणून घ्या नवे दर

PM Narendra Modi : ‘बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणं, ही माझ्या जीवनातील पहिली

‘आणखी किती फेकणार मोदीजी, हद झाली राव’, काँग्रेसकडून पंतप्रधानांवर खरमरीत टीका

Ashok Chavan : ‘आरक्षण मर्यादेचा प्रश्न केंद्र सरकारकडून अनुत्तरीत, राज्याला सकारात्मक निकाल अपेक्षित’

PM मोदींच्या बांगलादेश दौऱ्याला विरोध, 4 आंदोलकांचा मृत्यू

दुर्दैवी ! फॅशन स्ट्रीटची आग विझवून घरी परतताना कॅन्टोनमेंट बोर्डाच्या अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू

… म्हणून देवेंद्र फडणवीस घाबरलेत, नवाब मलिकांचा पलटवार

‘निवडणूक पश्चिम बंगालमध्ये अन् पंतप्रधान मोदी बांगलादेशातील काली मंदिरात’

भावी पोलिस अधिकाऱ्यांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन, महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनीत ‘डान्स पार्टी’

Related Posts