IMPIMP

Phone Tapping : फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावर पटोलेंचे उत्तर, म्हणाले – ‘आम्ही देश विकून देश चालवत नव्हतो, काँग्रेसने देशाला उभं केलं’

by pranjalishirish
congress nana patole bjp devendra fadanvis allegations phone tapping

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन-  राज्यात सध्या फोन टॅपिंगचे प्रकरण गाजत आहे. याच प्रकरणावरुन भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून राज्य सरकारवर हल्लाबोल करत आहेत. या प्रकरणात राज्यपालांनी लक्ष घालावे या मागणीसाठी भाजपच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी फोन टॅपिंग प्रकरणात राज्य सरकारकडून अहवाल मागवावा अशी मागणी राज्यपालांकडे केली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका करताना काँग्रेस हा अस्तित्वहीन पक्ष आहे. तसेच काँग्रेसचा हिस्सा किती हे त्यांनी सांगावे असा टोला लगावला होता. फडणवीस यांच्या टीकेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

Gold Price Today : सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण; जाणून घ्या पुणे-मुंबईतील आजचा भाव

नाना पटोले Nana Patole यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलवार करताना म्हटले, आम्ही देश विकून देश चालवत नव्हतो. वाटा आणि घाटा हे फडवीसांच्या सरकारमध्ये सर्व जनतेने पाहिले आहे. RSS ला कसा वाटा पुरवला गेला होता. आरएसएसची लोकं कशी मंत्रालयात होती, किती लोकं होती याचा आकडा आम्ही सरकारला जाहीर करण्यास सांगणार आहोत. मी मुख्यमंत्र्यांना भेटून यावर चर्चा करणार आहे. जे भ्रष्टाचारात गुंतलेले आहेत तेच आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत असल्याचा टोला त्यांनी भाजपला लगावला. आम्ही देश विकून देश चालवत नव्हतो, काँग्रेसने देशाला उभं केलं आहे, असे पटोले यांनी सांगितले.

घरचा आहेर देत ठाकरे सरकारमधील मंत्र्यानंच केलं ‘असं’ आवाहन, म्हणाले – ‘… तर अजित पवारांच्या घरावर मोर्चा काढा’

नाना पटोले Nana Patole  पुढे म्हणाले, या देशाला महासत्ता बनवण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. मात्र, देशाला विकून देश चालवणारे लोक काँग्रेसला वाट्याचं सांगत आहेत. फडणवीस सरकारमध्ये जे पाप झाले ते राज्य सरकारने उघडकीस करावं. परमबीर सिंह कोणाच्या पे रोलवर होते हे सर्वांना माहित असून वाटा भाजपवाले कसा घेतात हे जनतेला माहिती असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.

‘भाई जगताप असा टपोरी ज्याला ‘भाई’ बनायचं होतं पण… ; निलेश राणेंची टीका

राज्यपालांवर टीका करताना पटोले Nana Patole म्हणाले, राजभवन हे भाजपचे कार्यालय झाले असून राज्यपालांची भूमिका संशयास्पद आहे. त्यांनी काय अहवाल देयचा हा त्यांचा अधिकार आहे. पण महाराष्ट्राला बदनाम करण्याचा जो ठेका घेताल आहे त्याला महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही, असेही नाना पटोले यांनी म्हटले आहे.

Aslo Read : 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांना देखील ‘कोरोना’ची लागण, यापूर्वीच आदित्य आढळले होते Covid-19 पॉझिटिव्ह

ममता बॅनर्जींनी 10 वर्षांच्या सत्ताकाळात बंगालला कंगाल केले, रामदास आठवले यांची टीका

धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा ‘कोरोना’ची लागण

GROHE Hurun Report : मंगल प्रभात लोढा देशातील सर्वात ‘श्रीमंत’ बिल्डर, जाणून घ्या त्यांच्यासह इतर मोठया ग्रुपच्या संपत्तीबाबत

‘देवेंद्र फडणवीस हे अहंकारी आणि लबाड, माझ्याकडे त्यांच्या प्रकरणांचा गठ्ठा !’

फोन टॅपिंग करण्याचा अधिकार फडणवीसांना दिला कोणी; जयंत पाटलांचा सवाल

गृहमंत्री देशमुख यांच्यावरील कथित आरोप प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल, चौकशीसाठी स्वतंत्र यंत्रणा नेमण्याची मागणी

Related Posts