IMPIMP

काँग्रेसला शंका ! ‘ती’ इनोव्हा परमबीर सिंग यांच्या ऑफिसमधील

by pranjalishirish
Congress sachin sawant attacks on bjp over parambir singh and sachin vaze case

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – मनसुख हिरन हत्याप्रकरण, सचिन वाझे प्रकरण व फोन टॅपिंग प्रकरणावरुन राज्यातील विरोधी पक्ष भाजपनं सरकारला चांगलंच घेरलं आहे. या प्रकरणावरुन भाजप सरकारवर गंभीर आरोप करत आहेत. दरम्यान, काँग्रेसनं Congress  भाजपच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिलं आहे. ‘रश्मी शुक्ला या देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू अधिकारी आहेत हे आता स्पष्ट झालं आहे. त्यांनी पदाचा दुरुपयोग केला आहे त्याबद्दल त्यांनी माफीही मागितली आहे. परमबीर सिंह यांची चौकशी होऊ नये आणि त्यावरुन लक्ष्य वळवण्यासाठी हे प्रकरण सात महिन्यांनंतर पुन्हा काढण्यात का आलं?;’ असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. काँग्रेस Congress  नेते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपच्या आरोपांवर उत्तर दिलं आहे.

शशी थरूर यांनी मागितली PM नरेंद्र मोदींची माफी

काँग्रेसचे Congress  प्रवक्ते सचिन सावंत यांनी ‘अर्णब गोस्वामी प्रकरणात परमबीर सिंग यांना पंतप्रधानांनी ३११ कलम अधिकारानुसार बडतर्फ करावं, अशी मागणी भाजपनं केली होती. मग अचानक परमबीर सिंग भाजपला विश्वासू व प्रिय वाटायला लागले?,’ ‘अंबानींच्या घरासमोर वाझेंनी कार उभी केल्यानंतर त्या काळात वाझे कोणाकोणाला भेटले?, असा सवालही केला आहे.

वाहनधारकांना दिलासा ! ड्रायव्हिंग लायसन्स, RC वैधतेबाबत केंद्राची महत्वपूर्ण घोषणा

सचिन वाझेंनी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात थेट परमबीर सिंग यांच्याकडे तक्रार केली होती. वाझे हे एपीआय दर्जाचे अधिकारी होते. त्यांच्यावर अनेक वरिष्ठ अधिकारी होते. या सर्व अधिकाऱ्यांना बायपास करून वाझेंनी थेट सिंग यांच्याकडे तक्रार केली. त्यामुळे वाझे सिंग यांच्या किती जवळचे होते हे स्पष्ट होते. तसेच वाझेंचं कार्यालय ही सिंग यांच्या कार्यालयाच्या २०० फुटाच्या अंतरावर होते. या गुन्ह्यात वापरण्यात आलेली इनोव्हा गाडीही सिंग यांच्या कार्यालयातीलच आहे.

भावी पोलिस अधिकाऱ्यांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन, महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनीत ‘डान्स पार्टी’

तसंच वाझे वारंवार सिंग यांना थेट भेटायचे. त्यामुळे वाझे हे कुणाच्या संपर्कात होते आणि जवळचे होते हे स्पष्ट होत आहे,’ अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे. ‘१० मार्चला एटीएसनं पत्र लिहून परमबीर सिंग यांच्या कार्यालयातील डिव्हीआर मागितला. तेव्हा तो डीव्हीआर दिला गेला. मात्र, त्यानंतर दीड दोन तासांत एटीएसच्या प्रमुखांना फोन जातो डीव्हीआर नीट दिसत नाहीये आम्ही तो दुरुस्त करुन पुन्हा देतो. मात्र आता तो डीव्हीआर गायब झाला आहे. याची चौकशी होण्याची गरज आहे,’ अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Also Read

भाजपच्या सर्व आरोपांना उत्तर देत काँग्रेसनं विचारला प्रश्न – ‘…मग फडणवीसांनी 6.3 GB चा कोणता पेनड्राईव्ह दाखवला?’

होय, दीपाली चव्हाणांना वाईट वागणूक मिळत होती, वन्यजीव रक्षकाचा दावा

Gold Rates Today : सोन्या चांदीच्या दरात पुन्हा घसरण, जाणून घ्या नवे दर

PM Narendra Modi : ‘बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणं, ही माझ्या जीवनातील पहिली

‘आणखी किती फेकणार मोदीजी, हद झाली राव’, काँग्रेसकडून पंतप्रधानांवर खरमरीत टीका

Ashok Chavan : ‘आरक्षण मर्यादेचा प्रश्न केंद्र सरकारकडून अनुत्तरीत, राज्याला सकारात्मक निकाल अपेक्षित’

PM मोदींच्या बांगलादेश दौऱ्याला विरोध, 4 आंदोलकांचा मृत्यू

दुर्दैवी ! फॅशन स्ट्रीटची आग विझवून घरी परतताना कॅन्टोनमेंट बोर्डाच्या अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू

… म्हणून देवेंद्र फडणवीस घाबरलेत, नवाब मलिकांचा पलटवार

‘निवडणूक पश्चिम बंगालमध्ये अन् पंतप्रधान मोदी बांगलादेशातील काली मंदिरात’

Related Posts