IMPIMP

खासदार मोहन डेलकर यांच्या सुसाईड नोटमध्ये भाजपच्या ‘या’ दिग्गज नेत्याचं नाव, काँग्रेसचा ‘गौप्यस्फोट’

by sikandershaikh
mp-mohan-delkar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर (Mohanbhai Delkar) यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईच्या एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली. या घनटेनंतर तपास करताना पोलिसांना त्यांच्या खोलीत सुसाईड नोट सापडली. जवळपास 14-15 पानांच हे पत्र होतं. यात अनेक बडे नेते आणि पदाधिाऱ्यांची नावं असल्याचं सांगितलं जात आहे. आता यात भाजपच्या बड्या नेत्याचं नाव असल्याचा गौप्यस्पोट काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी केला आहे.

याबाबत बोलताना सचिन सावंत म्हणाले, ज्यांच्यावर देशाचे कायदे बनण्याची जबाबदारी आहे,
अशा 7 वेळा खासदार राहणाऱ्या मोहन डेलकर (Mohanbhai Delkar) यांना इतकं असहाय
आणि विवश व्हावं लागलं की, त्यांनी आपलं जीवनच संपवण्याच निर्णय घेतला.
गेल्या दीड वर्षांपासून आपल्यावरील प्रचंड मोठ्या दबावाची आणि छळवणुकीची गाथा त्यांनी स्वत:च व्हिडीओद्वारे तसंच संसदेत भाषणातूनही मांडली होती.
त्यांनी आपल्या व्हिडीओ संदेशात भाजप नेत्यांच्या नावाचा उल्लेख केला होता.
तसंच त्यांनी मृत्यूपर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये भाजपचे गुजरातचे माजी मंत्री आणि सध्याचे दादरा नगर हवेलीचे प्रसासक प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांचं नाव घेतलं आहे.
यातूनच भाजपच्या त्रासाला कंटाळून मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली हे स्पष्ट आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला.

सचिन सावंत असंही म्हणाले, मृत्यूनंतर तरी न्याय मिळावा म्हणून डेलकरांनी मुंबईत येऊन आत्महत्या केली.
महाविकास आघाडी सरकारनं डेलकरांच्या आत्महत्या प्रकरणी सखोल चौकशी करून डेलकर
कुटुंबीयांना न्याया द्यावा अशी मागणीही सावंत यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याकडे केली.

Related Posts