IMPIMP

Video : नितेश राणेंचा सरकारवर घणाघात; ‘कोरोना’, ‘टक्केवारी’, ‘पूजा चव्हण’ अशा अनेक प्रकरणांवरून केले गंभीर आरोप

by amol
nitesh-rane-uddhav-thackaray

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी काल विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. विरोधी पक्षानं आणलेल्या 293 प्रस्तावावर बोलताना त्यांनी याबाबत भाष्य केलं. कोरोना संकटाच्या स्थितीत झालेला भ्रष्टाचार, राज्यातील कायदा व सुव्यवस्था टक्केवारीचे गणित यापासून तर सध्या गाजत असलेल्या पूजा चव्हाण प्रकरणांपर्यंत (Pooja Chavan Suicide Case) विविध विषयांवरून नितेश राणे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली.

‘आर्थिक संकट केवळ सामान्यांसाठी, सरकारकडून राजेरोसपणे भ्रष्टाचार सुरू’

नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले, अर्थसंकल्पातून जास्त अपेक्षा ठेवू नये, असं सरकार सांगतंय. राज्यासमोर आर्थिक संकट आहे असं सरकार सांगतंय. परंतु हे आर्थिक संकट केवळ शेतकरी आणि कामगारांसाठीच आहे का. पण सरकारमध्ये बसलेले लोक राजरोसपणे लूट करताहेत. भ्रष्टाचार करताहेत. त्याबाबतही विचार झाला पाहिजे. कारण हे आर्थिक संकट केवळ सामान्य लोकांसाठी आहे. सरकारकडून राजेरोसपणे भ्रष्टाचार सुरू आहे. त्याबाबत कुणी बोलत नाही. सरदेसाई सारख्या व्यक्तींना सरकार पाठींबा देतंय. ते कंत्राटदारांना फोन का करतात, त्यांना वाय दर्जाची सुरक्षा का दिली जातेय.

‘डिनो मोरिया सरकारचा जावई आहे का?’

पुढं बोलताना राणे म्हणाले, बीकेसीमधील वैभव चेंबर्स नावाच्या इमारतीत अधिकारी का जातात. जंबो कोविड सेंटरबाबत उल्लेख केला जातोय. याबाबत अमित साटम यांनी पुस्तिकाच प्रकाशित केली आहे. जंबो कोविड सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. मुंबईमध्ये नाईट लाईफ नावाची गँग कार्यरत आहे. डिनो मोरिया सरकारचा जावई आहे का? मनपा आणि सरकारमधील कुठलंही काम असल्यास करून देतो सांगतो, त्याला अधिकार कुणी दिलेत असे अनेक सवाल त्यांनी यावेळी बोलताना केले.

‘राज्यातील सरकारचे 5 आणि 8 हे आवडते आकडे’

नितेश राणे म्हणाले, राज्यातील सरकारचे 5 आणि 8 हे आवडते आकडे आहेत. 5 आणि 8 च्या पुढं जात नाहीत. जोपर्यंत हे आकडे येत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला आशीर्वाद मिळणार नाही, असं ठरलंय. आता हे 5 दिवस आहेत, 5 तास आहेत की, 5 टक्के आहेत. ते आता तुम्हीच ठरवा. पण हे आपल्या राज्यात चाललंय असा आरोपही नितेश राणे यांनी केला.

‘राज्याला परिवहन मंत्री नाही, आहेत ते परिवार मंत्री बनलेत’

यावेळी राज्याला एक परिवहन मंत्री द्या अशी मागणी करत नितेश राणे यांनी अनिल परब यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, अध्यक्ष महोदय राज्याला एक परिवहन मंत्री द्या, राज्याला परिवहन मंत्री नाही. आहेत ते परिवार मंत्री बनले आहेत. ते कलानगरच्या अवतीभवती घुटमळत असतात. कलानगरच्या बाहेर पडावं, मंत्रालय आहे, एसटी कामगार आहेत. त्यांचा पगार आहे, त्यात लक्ष घाला असा सल्लाही त्यांनी यावेळी बोलताना दिला.

‘काही बोललं की, जुन्या केस उकरून काढल्या जातात’

राणे म्हणतात, आमच्या आमदारांना धमकीचे फोन येतात. त्याची चौकशी होत नाही. चित्रा वाघ यांच्या वाहनामागे एक वाहन पाळतीवर असते. आता कुणी धमक्या दिल्यानंतर कारवाई होत नसेल तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी कायदा सुव्यवस्था हाती घेतली तर आमच्यावर केस करायच्या नाहीत. काही बोललं की, जुन्या केस उकरून काढल्या जातात. अशी केस आहे तशी केस आहे सांगितलं जातं. पण जुनं बोलायचं झालं तर आमच्याकडे खूप आहे. तुमच्यासोबत 39 वर्षे काढली आहेत. पण आम्हालाही बाळासाहेबांची शिकवण माहिती आहे. अंगावर आले तर शिंगावर घ्या. त्यामुळं जुन्या गोष्टींची आठवण थांबावायचा प्रयत्न केला तर मग सोनू निगम पण निघेल आणि आणखी काही निघेल हे लक्षात ठेवा.

‘ते शक्तीप्रदर्शन जनतेला घाबरवण्यासाठी होतं की, महिलांना ?’

नितेश राणे म्हणाले, कायदा दुसऱ्यांना लागू आहे.
तोच अन्य लोकांना लागू झाला पाहिजे. पूजा चव्हाण प्रकरण आहे. 11 की 12 ऑडिओ क्लीप त्यातून बरंच काही स्पष्ट होतं.
तरी 10-12 दिवस लागतात बाहेर पडण्यासाठी एवढे दिवस का लागतात. शक्तीप्रदर्शन करण्यासाठी का.
ते शक्तीप्रदर्शन कुणाला घाबरवण्यासाठी होतं. राज्यातील जनतेला की, महिलांना घाबरवण्यासाठी.
बघा आमच्या विरोधात काही बोलाल तर आमच्याकडे किती ताकद आहे ती.
गुन्हेगारांची हिंमत का वाढते याचा विचार करायला हवा. गेल्या दीड वर्षात एक कवच तयार झालंय.
मंत्री अडचणीत सापडला की यंत्रणा कामाला लागते अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

‘गायकवाड ताईंना सांगितलं पाहिजे याचीही एक शाळा सुरू करा’

एखादं प्रकरण पद्धतशीरपणे कसं लपवायचं याचा ट्रेनिंग कॅम्प हे सुरू करतील म्हणजे उद्या काही त्रास नाही.
गायकवाड ताईंना सांगितलं पाहिजे याचीही एक शाळा सुरू करा असा टोलाही नितेश राणे यांन लगावला.

Related Posts