IMPIMP

Devendra Fadnavis | ‘पडळकरांच्या केसाला धक्का लागला तरी आम्ही गप्प बसणार नाही’ – देवेंद्र फडणवीस (व्हिडीओ)

by nagesh
Lok Sabha Election 2024 | loksabha election 2024 bjp mission 48 seat announced devendra fadnavis

सोलापूर / पंढरपूर : सरकारसत्ता ऑनलाइन  Devendra Fadnavis | भाजपचे (BJP) विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) आणि त्यांच्या काही समर्थकांवर काल (रविवारी) सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्‍यात हल्ला (Attack) करण्यात आला. यामुळे तेेथील वातावरण चांगलंच तापलं आहे. या पार्श्वभुमीवर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या हल्ल्याचा निषेध करत राज्य सरकारने (Maharashtra Government) हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी देखील केली आहे. त्यावेळी ते सोमवारी पंढरपुरात बोलत होते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी श्री विठ्ठल-रुक्‍मिणीचे दर्शन घेतले. यावेळी खासदार रणजितसिंह निंबाळकर (MP Ranjit Singh Nimbalkar),
आमदार राम सातपुते (MLA Ram Satpute), आमदार जयकुमार गोरे (MLA Jayakumar Gore), जिल्हा भाजप अध्यक्ष श्रीकांत देशमुख (Srikant Deshmukh),
उमेश परिचारक (Umesh Paricharak) आदी उपस्थित होते.
त्यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमदार गोपीचंद पडळकर हे राज्य सरकारच्या (State Government) घोटाळ्यांबाबत आवाज उठवत आहेत.
त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी, आम्ही ते सहन करणार नाही.
राज्य सरकारने आमदार पडळकर यांना तत्काळ संरक्षण द्यावे, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

 

https://fb.watch/98WVwojpv1/

 

दरम्यान, पुढे फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, लोकशाहीमध्ये सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे.
परंतु, महाविकास आघाडी सरकार भाजप कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारच्या अशा धमक्‍यांना आम्ही घाबरणार नाही.
हल्लेखोरांवर तत्काळ कारवाई करून त्यांना अटक करावी, अशी मागणी देखील फडणवीस यांनी केली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title : Devendra Fadnavis | BJP leader devendra fadnavis demanded that the maharashtra government should provide protection to mla gopichand padalkar

 

हे देखील वाचा :

Pune Metro | हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे काम 7 दिवसांत सुरू करावे अन्यथा आंदोलन करणार; खासदार गिरीश बापट यांचा PMRDA ला इशारा

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात 10 वर्षाच्या मुलाचं दहा वर्षाच्या पोराशी अनैसर्गिक कृत्य, प्रचंड खळबळ

Smoking-Drinking Alcohol | सिगारेट-दारू प्यायल्याने कमी होतात का दु:ख-वेदना अन् तणाव, वाढते काम करण्याची क्षमता; जाणून घ्या मनोचिकित्सकाकडून

 

Related Posts