IMPIMP

Devendra Fadnavis on Thackeray Government | फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा; म्हणाले – ‘नवाब मलिकांसाठी नव्हे तर आरक्षणासाठी धडपड केली असती तर…’

by Team Deccan Express
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray | after uddhav thackeray statement deputy cm devendra fadnavis said on metro car shed issue that we will take an appropriate decision

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाइन Devendra Fadnavis on Thackeray Government | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यावरुन ठाकरे सरकारवर (Thackeray Government) निशाणा साधला आहे. ‘महाविकास आघाडीचे सरकार 2 वर्षांपासून इम्पेरिकल डेटा तयार करण्यासाठी कोणतीही धडपड करीत नाहीये. ओबीसी आरक्षणासाठी कोणतीही धडपड केली नाही. याउलट तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) हे मंत्रिमंडळात राहावे यासाठी धडपड केली जातेय. याच्या अर्धी तरी धडपड केली असती तर ओबीसी आरक्षण गेले नसते,” असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ”नवाब मलिकांचे डी-गँगशी संबंध असल्याचे स्पष्ट झाल्याने विरोधकांचे महाविकास आघाडीवरील हल्ले वाढले आहेत.
नवाब मलिक यांना मंत्रिमंडळात ठेवण्यासाठी महाविकास आघाडीकडून अट्टाहास केला जात आहे.
डी-गॅंगशी संबंध असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही हा प्रकार सुरू असल्याचं,” ते म्हणाले. (Devendra Fadnavis on Thackeray Government)

पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले, ”याच सरकारने इम्पेरिकल डेटा तयार करण्यासाठी अशी धडपड केली असती तर बरं झाल असतं.
ओबीसी आरक्षणासाठी धडपड करण्याची गरज असताना मलिकांसाठी यांनी धडपड केली.
याच्या अर्धी धडपड जरी केली असती तर ओबीसी आरक्षण गेले नसते.
दोन वर्षांपासून महाविकास आघाडी सरकारने काहीही केले नसल्याचं,” त्यांनी म्हटले आहे.

 

‘नवाब मलिकांचे डी-गँगशी संबंध’

आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांखाली तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात सहभागी असल्याचे ईडीने (ED) दाखल केलेल्या दोषारोपपत्रात म्हटले आहे.
मलिक यांचे डी-गँगशी संबंध होते. मलिक हे हसीना पारकर, सलीम पटेल, सरदार शहावली खान यांच्या संपर्कात असल्याचीही माहिती आहे.
डी-गँगशी संबंध ठेवूनच मलिकांनी गोवावाला कंपाऊंडची जागा मिळवली, असे दोषारोप पत्रात ईडीने म्हटले आहे.
दरम्यान, मनी लाँड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) नवाब मलिक यांचे दाऊदच्या टोळीशी थेट संबंध असल्याचे सकृतदर्शनी पुरावे आहेत, असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.

 

Web Title :- Devendra Fadnavis on Thackeray Government | BJP leader devendra fadnavis nawab malik maha vikas aghadi obc reservation maharashtra thackeray government

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

हे देखील वाचा :

Related Posts