IMPIMP

Devendra Fadnavis । नाना पटोलेंच्या स्वबळाच्या घोषणेनं शिवसेना-राष्ट्रवादीला कापरं भरलं, अन्…

by bali123
devendra fadnavis reaction on nana patoles allegations on maha vikas aghadi

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis । मागील काही दिवसापासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहेत. तसेच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) माझ्यावर पाळत ठेवत आहेत असा गंभीर आरोप नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. तत्पूर्वी त्यांनी आगामी निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढण्याचे जाहीर केले. या पार्श्वभूमीवर आता भाजपचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी सवांद साधला.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर केलेल्या गंभीर आरोपवर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नाना पटोले यांनी स्वबळाची घोषणा केल्याने राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेनेला (Shiv Sena) कापरं भरलंय. त्यांना जेवण जात नाहीय, पाणीही पिता येत नाहीय. ते अत्यंत घाबरलेले आहेत. म्हणून त्यांनी नाना पटोलेंवर पाळत ठेवली आहे असं नानांचं म्हणणं आहे. आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी याबाबत उत्तर द्यावं. त्याबद्दल मी काय बोलणार, असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

या दरम्यान ,’पोलिसांच्या मारहाणीत मृत्यूमुखी पडलेल्या मनोज ठवकर यांच्या कुटुंबीयांची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. त्यावेळी त्यांना भाजपकडून 2 लाखांची आर्थिक मदत जाहीर केली. ठवकर हे कोठडीत नव्हते. ते गुन्हेगार नव्हते. मास्क लावला नाही हा काही मोठा गुन्हा ठरत नाही. तो फाईनचा गुन्हा आहे. या गुन्ह्यात अटक करता येत नाही. शिक्षाही करता येत नाही.
म्हणून मनोज ठवकर यांना पकडून पोलिसांनी मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाला.
ही एक प्रकारे हत्याच आहे.
|म्हणून संबंधित पोलिसांना निलंबित करा.
त्यांची बदली करून पाठिशी घालू नका, असं त्यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Web Title : devendra fadnavis reaction on nana patoles allegations on maha vikas aghadi

Related Posts