IMPIMP

Sukma Naxal Attack : ‘निवडणूकजीवी मोदी-शहांनी जवानांच्या जीवाची तरी किंमत आहे का ?’

by pranjalishirish
does modi shah who election campaigner have any value lives soldiers congress modi and shah

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- छत्तीसगडमध्ये 25 लाख इनाम असलेल्या नक्षलवाद्याला पकडण्यासाठी गेलेल्या 2000 सुरक्षा जवानांच्या एका तुकडीला घेरून नक्षलवाद्यांनी जोरदार हल्ला केला. छत्तीसगडमधील बस्तरच्या बीजापूरमध्ये शनिवारी (दि.3) नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत 24 जवान शहीद झाले. तर एक जवान बेपत्ता झाला आहे. हा बेपत्ता जवान आपल्या ताब्यात असल्याचा फोन नक्षलवाद्यांनी एका पत्रकाराला करुन काही अटी ठेवल्याने खळबळ उडाली आहे. यावरुन महाराष्ट्र काँग्रेसने मोदी Narendra Modi  सरकारवर आरोप केला आहे. बेपत्ता जवानाला सुखरुप परत आणण्यासाठी मोदी सरकार काहीच करत असल्याचा आरोप महाराष्ट्र काँग्रेसने केला आहे.

‘100 कोटींच्या टार्गेटची आठवण पदावरुन हटवल्यावरच का झाली?’, राज ठाकरेंचा सवाल

कोब्रा कमांडो दलाचे जवान राकेश्वर सिंग मनहास हे नक्षलवाद्यांच्या ताब्यात आहेत. नक्षलवाद्यांनी पत्रकाराशी बोलताना हा दावा केला आहे. जवानाला कोणतेही नुकसान पोहोचवणार नसल्याचे नक्षलवाद्यांनी सांगितले आहे. मात्र, अद्यापही मोदी Narendra Modi सरकारकडून या जवानाच्या सुटकेसाठी कोणताही प्रयत्न करण्यात आलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे केवळ निवडणुकांमध्ये व्यस्त असल्याचा आरोप महाराष्ट्र काँग्रेसने ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.

महाराष्ट्र काँग्रेसने ट्विटमध्ये म्हटले आहे की, नक्षल्यांनी ओलीस ठेवलेल्या कोब्रा कमांडो राकेश्वर सिंग मिनहास यांच्या सुटकेसाठी मोदी Narendra Modi  सरकार काहीच ठोस पावलं उचलताना दिसत नाहीत. सत्तेच्या लालसेपायी देशाचा कारभार वाऱ्यावर सोडून निवडणुकीच्या प्रचारात फिरणाऱ्या निवडणूकजीवी मोदी-शहांना जवानांच्या जिवाची जरा तरी किंमत आहे का ? असा प्रश्न महाराष्ट्र काँग्रेसने विचारला आहे. तसेच मोदी आणि शहा हे निवडणुकांच्या प्रचार दौऱ्यातच व्यस्त असल्याचाही आरोप काँग्रेसने केला आहे.

Raj Thackeray : ‘माझ्यासाठी अनिल देशमुखांचा विषय महत्त्वाचा नाही, अंबानींच्या घराखाली बॉम्बची गाडी ठेवली कुणी हे महत्त्वाचं

नक्षलवाद्यांनी घात केला

छत्तीसगडच्या नक्षलवादी हल्ल्यात 24 जवान शहीद झाले आहेत. कुख्यात नक्षलवादी हिडमाला पकण्यासाठी जवानांनी त्यांच्या क्षेत्रात प्रवेश केला होता. 2000 जवानांची टीम वेगवेगळ्या भागात हिडमाच्या टीमला पकडण्यासाठी जंगलात शिरली होती. सुरुवातीला नक्षलवाद्यांनी जवानांना जंगलात शिरु दिले. त्यांना कोणीही अडवले नाही. सुरक्षा दलाची टीम अनेक भागात विखुरलेली होती. एका टीमला हिडमाच्या बटालियनने घेरले. त्यानंतर त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला.

Read More : 

‘अनिल देशमुखांच्या निवासस्थानी 100 कोटींबाबतचे पुरावे नष्ट करण्याचे काम सुरु, CBI ने कारवाई करावी’

‘सचिन वाझे, परमबीर यांनी जे केलं तेच देशमुखांनी कारावे, शरद पवार, उद्धव ठाकरेंनी वसुली करण्याचे सांगितलं असं थेट सांगावं’

जे समोर आलं ते फक्त हिमनगाच्या टोकाप्रमाणे, आगे आगे देखो…होता है क्या?’ – भाजप नेते गिरीश महाजन

राज ठाकरेंचा परप्रांतीयांवर पुन्हा ‘हल्लाबोल’, म्हणाले – ‘परप्रांतीयांमुळे महाराष्ट्रात कोरोना वाढतोय’

‘देशानं पहिल्यांदाच पोलीस बॉम्ब ठेवतात अन् गृहमंत्री हप्ता वसुली करताना पाहिलं’

अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर उदयनराजे शरद पवारांच्या भेटीला; चर्चांना उधाण

पश्चिम बंगाल : मतदानांपूर्वीच नेत्याच्या घरी EVM मशीन !

शिवेंद्रसिंहराजे म्हणतात – ‘व्यवसाय बंद ठेवून मरण्यापेक्षा…’

ताईंचा नवरा भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकलेला अन् ताई विचारतात, नवा वसुली मंत्री कोण ?

Related Posts