IMPIMP

जाणून घ्या : पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी दिलेले समाधान आवताडे यांच्याबद्दल

by pranjalishirish
Find out: About Samadhan Avtade nominated by BJP for Pandharpur by-election

पंढरपूर : सरकारसत्ता ऑनलाइन- पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी Pandharpur by-election  भाजपकडून दामाजी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर समाधान आवताडे यांनी फेसबुक पोस्ट करत पक्षाचे आभार मानले आहेत. भाजपकडून परिचारक यांना उमेदवारी मिळणार की आवताडे याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते. अखेर भाजपने समाधान आवताडे यांना पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

लोकप्रिय मराठी गायिका वैशाली माडे ‘या’ दिवशी करणार राष्ट्रवादीत प्रवेश !

मंगळवारी समाधान आवताडे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी स्वत: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह जिल्ह्यातील बडे नेते हजेरी लावणार आहेत. दरम्यान आमदार प्रशांत परिचारक यांनी समाधान आवताडे यांना पाठिंबा देत निवडणूक एकदिलाने लढण्याचा निर्णय घेतला. भाजप पक्षश्रेष्ठींनी परिचारक व आवताडे यांच्या मनोमिलन घडवून आणले. त्यामुळे आता महाविकास आघाडीचे भालके विरुद्ध भाजपचे आवताडे यांच्यामध्ये सामना रंगणार आहे.

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी  Pandharpur by-election भाजपकडून उमेदवार असलेले आवताडे यांनी 2014 मध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. तर 2019 मध्ये अपक्ष निवडणूक लढवली होती. दोन्ही निवडणुकीत त्यांना जवळपास 60 हजार मते मिळाली होती. या निवडणुकीत भाजपने आवताडे यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने सहानुभूतीच्या लाटेतही महाविकास आघाडी समोर तगडे आव्हान उभे केले आहे.

दादांनी सुचवलं अन् बहिणीनं ऐकलं, अजित पवारांकडून सुचना मिळताच सुप्रिया सुळेंनीं उचलले ‘हे’ पाऊल

मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा निवडणुकीत भालके, आवताडे यांच्यासह शैला गोडसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील, तसेच वंचित बहुजन आघाडी, एमआयएम, धनगर समाज यांचे देखील उमेदवार रिंगणात असणार आहेत. त्यामुळे भालके यांच्यासाठी सुरुवातीला सोपी वाटणारी लढत आता अटीतटीची होणार आहे.

Also Read

शरद पवार आणि अमित शहांमध्ये गुप्त बैठक?, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ, चर्चांना उधाण

‘त्या’ वक्तव्याबाबत अजित पवारांनी संजय राऊतांना फटकारले; म्हणाले – ‘मिठाचा खडा टाकण्याचे काम कुणी करू नये’

Sanjay Raut : … म्हणून 12 आमदारांची अद्याप नियुक्ती नाही

वसुलीच्या आरोपावरून आपल्याच लोकांकडून मिळाला घरचा ‘आहेर’ ! अनिल देशमुख म्हणाले – ‘मुख्यमंत्र्यांकडे केली होती मागणी, सेवानिवृत्त न्यायाधीशांकडून केली जावी चौकशी’

Mann ki Baat : ‘देशाने वाजवलेल्या टाळ्या आणि थाळ्या कोरोना योद्ध्यांच्या हृदयाला स्पर्श करुन गेल्या’

‘होळीवर बंदी अन् शब-ए-बारातला परवानगी, राज्यात सरकार उद्धव ठकारेंचं आहे की, मुस्लिम लीगचं?’

Related Posts