IMPIMP

Sanjay Raut : … म्हणून 12 आमदारांची अद्याप नियुक्ती नाही

by nagesh
Sanjay Raut | shivsena mp sanjay raut criticized bjp over statement on shivaji maharaj by bhagat singh koshyari

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – सचिन वाझे प्रकरणानंतर माजी पोलीस आयुक्तांनी टाकलेला लेटरबॉम्ब यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. यातच विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरत परमबीर सिंह यांनी केलल्या आरोपावरुन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच भाजपसह इतर विरोधी पक्षांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. याच प्रकरणावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay Raut) यांनी रोखठोकच्या माध्यमातून गृहमंत्र्यावर बाण चालवले आहेत. तसेच 12 आमदारांच्या नियुक्तीवरुन राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्न विचारले आहेत.

‘IPS शुक्ला यांच्या अहवालामुळे ठाकरे सरकारची चांगलीच तंतरलीय, खंडणीखोरीचे बिंग फुटले’; भाजप नेत्याची टीका

परमबीर सिंह आणि सचिन वाझे प्रकरणावरुन सरकारच्या डॅमेज कंट्रोलचा फज्जा उडाला असल्याचे राऊत sanjay Raut यांनी म्हटले आहे. तसेच महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या सर्व काळात काय केले ? राज्यपाल हे आजही ठाकरे सरकार जावे यासाठी राजभवनाच्या समुद्रात देव पाण्यात घालून बसले आहेत. परमबीर सिंह आणि अँटिलिया प्रकरणावरुन राज्यातील ठाकरे सरकार जाईल अशी आशा होती. मात्र, त्यावर पाणी पडले. महाराष्ट्रातील भाजप नेते उठसूठ राज्यपालांना भेटण्यासाठी जातात. त्यांच्याकडे राज्यातील सरकार बरखास्त करण्याची मागणी करतात. यामुळे राजभवनाची प्रतिष्ठा ही काळवंडली आहे.

अश्लील व्हिडीओ प्रकरणी भाजपचे माजी मंत्री अडचणीत ! तरुणीच्या तक्रारीनंतर FIR दाखल

सरकारने 12 राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवून सहा महिने उलटले. मात्र, राज्यपालांनी यावर कोणतीच कार्यवाही केली नाही. ते राज्यातील सरकार जाण्याची वाट पहात आहेत. हा घटनात्मक भंग आहे, असे गणीत राऊत यांनी मांडले आहे. संजय राऊत Sanjay Raut यांनी 12 आमदारांच्या नियुक्तीवर यापूर्वी देखील राज्यपालांवर निशाणा साधला आहे. 12 आमदारांची नियुक्ती होत नसल्याने राऊत यांनी राज्यपालांना प्रश्न विचारले. तसेच जोपर्यंत 12 आमदारांची नियुक्ती होत नाही, तोपर्यंत त्यांच्यावर टीका करणारच, असेही राऊत यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

‘भारतीयांपेक्षा अधिक लसी परदेशात पाठवल्याची कबुली सरकारनं UN समोर दिली, पण जर…’

शशी थरूर यांनी मागितली PM नरेंद्र मोदींची माफी

Bhandup Fire : ‘ठाकरे सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे 12 बळी’; भाजपची टीका

Related Posts