IMPIMP

Former MLA Mohan Joshi | ‘पूनावाला यांची जादा डोस देण्याची अजूनही तयारी, पण…’ भाजपचे करंटेपणामुळे डोस मिळेनात

by nagesh
Former MLA Mohan Joshi | Cyrus Poonawala fo Serum Institute is still ready to give extra dose, but ...' local bjp leader of pune

पुणे न्यूज : सरकारसत्ता ऑनलाइन Former MLA Mohan Joshi | कोविशिल्ड लसीचे (covishield) जादा डोस पुण्याला (Pune) देण्याची सिरम इन्स्टीट्यूटची (serum institute) अजूनही तयारी आहे, पण भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या (Local BJP Leader) करंटेपणामुळे जादा डोसला मुकावे लागत आहे, असा आरोप माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Former MLA Mohan Joshi) यांनी केला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

पुण्यातील साथीचा जोर पाहता कोविशिल्डचे जादा डोस देण्याची तयारी आहे.
असे सिरमचे संस्थापक सायरस पूनावाला (cyrus poonawalla) यांनी लोकमान्य टिळक पुरस्कार (lokmanya tilak award 2021) स्वीकारताना सांगितले.
फक्त याकरिता केंद्र सरकारच्या परवानगीची गरज आहे.
पूनावाला यांचे तरी ऐकून भाजपचे स्थानिक नेते हलतील का ? असा सवाल मोहन जोशी यांनी केला आहे.

 

साथीच्या दुसऱ्या लाटेत पुण्याला जबर तडाखा बसत होता.
त्या सुमारास सिरम इन्स्टीट्यूटचे आदर पूनावाला यांनी मे महिन्याच्या १४ तारखेला महापौरांना पत्र पाठविले आणि केंद्र सरकारची परवानगी घ्यावी असे सुचविले.
याला प्रतिसाद न देता महापौरांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना भेटू अशी उडवाउडवीची उत्तरे दिली.
लसीकरणाचे महत्त्व ओळखा आणि सिरमचे जादा डोस मिळवा.
पुणेकरांच्या जिवाशी खेळू नका असे आवाहन मी त्याच वेळी भाजपचे खासदार, आमदार आणि महापौरांना केले होते.
तीन महिने उलटले तरी भाजप नेते याबाबत गंभीर दिसत नाहीत.
असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

 

लसीकरणाचे राजकारण आम्हाला करावयाचे नाही, पण पूनावाला स्वतः जादा डोस देण्यास उत्सुक
असताना सत्ताधारी भाजपचे खासदार, महापौर केंद्राकडून मंजुरी आणू शकत नसतील तर तो
त्यांचा करंटेपणा म्हणावा लागेल, अशी खंत मोहन जोशी (Former MLA Mohan Joshi) यांनी व्यक्त केली आहे.

 

Web Title : Former MLA Mohan Joshi | Cyrus Poonawala fo Serum Institute is still ready to give extra dose, but …’ local bjp leader of pune

 

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | लागोपाठच्या घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर, जाणून घ्या 10 ग्रॅमचे नवे दर

Corona in India | चिंताजनक ! देशात मागील 24 तासांत 38,667 नवे बाधित, 478 जणांचा मृत्यू

Partition Horrors Remembrance Day | 14 ऑगस्टला ’विभाजन भय स्मरण दिन’ साजरा केला जाईल, PM म्हणाले – ‘फाळणीच्या वेदना विसरता येऊ शकत नाहीत’

Covid19 Infection | भविष्यात कोरोनाविरूध्द लढण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांना दिले निर्देश, मुलांसाठी 20 टक्के बेड राहतील ‘राखीव’

 

Related Posts