IMPIMP

Partition Horrors Remembrance Day | 14 ऑगस्टला ’विभाजन भय स्मरण दिन’ साजरा केला जाईल, PM म्हणाले – ‘फाळणीच्या वेदना विसरता येऊ शकत नाहीत’

by nagesh
Modi Cabinet Decision | cabinet meeting decision today india in hindi prime minister of india narendra modi telecom relief package approved auto pli bad bank

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  Partition Horrors Remembrance Day | उद्या भारताच्या स्वातंत्र्याचा 75वा वर्धापनदिन आहे. स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माहिती दिली की, 14 ऑगस्टला ’विभाजन भय स्मरण दिन’ म्हणून (Partition Horrors Remembrance Day) साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून म्हटले की, देशाच्या फाळणीच्या वेदना विसरता येऊ शकत नाहीत.

 

या फळणीत द्वेष आणि हिंसेमुळे आपल्या लाखो बहिणी आणि भावांना विस्थापित व्हावे लागले
आणि आपला जीव गमवावा लागला.
त्या लोकांचा संघर्ष आणि बलिदानाचे स्मरण म्हणून 14 ऑगस्टला ’विभाजन भय स्मरण दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील ट्विटमध्ये म्हटले आहे की, #PartitionHorrorsRemembranceDay चा हा दिवस आपल्याला भेदभाव,
शत्रुत्व आणि द्वेष नष्ट करण्यासाठी प्रेरणा देईल, तसेच यामुळे एकता, सामाजिक सदभावना
आणि मानवी संवेदनासुद्धा मजबूत होतील.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

14 ऑगस्ट 1947 ला ….

देशाच्या इतिहासात 14 ऑगस्टची तारीख आश्रूंनी लिहिली आहे.
हाच तो दिवस होता जेव्हा देशाचे विभाजन झाले आणि 14 ऑगस्ट 1947 ला पाकिस्तान तसेच 15 ऑगस्ट 1947 ला भारताला एक स्वतंत्र राष्ट्र घोषित करणत आले.
या विभाजनात भारतीय उप-खंडाचे दोन तुकडे करण्यात आले तसेच बंगालचे सुद्धा विभाजन करण्यात आले आणि बंगालचा पूर्व भाग वेगळा करूनपूर्व पाकिस्तान बनवण्यात आला.
जो 1971 च्या युद्धानंतर बांगलादेश बनला.

 

बोलायला तर ही एका देशाची विभागणी होती, परंतु ही हृदयांची, कुटुंबांची, नात्यांची आणि भावनांची विभागणी होती.
भारतमातेच्या हृदयावर विभागणीच्या या जखमा अनेक शतकांपर्यंत राहतील आणि पुढील पीढ्या या तारखेचे दु:ख अनुभवतील.

 

Web Title : Partition Horrors Remembrance Day | 14 august partition horrors remembrance day partition s pains can never be forgotten says pm narendra modi

 

हे देखील वाचा :

Covid19 Infection | भविष्यात कोरोनाविरूध्द लढण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांना दिले निर्देश, मुलांसाठी 20 टक्के बेड राहतील ‘राखीव’

Eta Variant of Covid-19 | नवं संकट ! कर्नाटकमध्ये समोर आला कोरोना व्हायरसचा ‘Eta व्हेरिएंट’, जाणून घ्या किती आहे धोकादायक

Coronavirus in Maharashtra | महाराष्ट्रात एंट्रीसाठी दोन्ही ‘डोस’ आवश्यक, RTPCR रिपोर्ट नसेल तर 14 दिवस राहावे लागेल ‘क्वारंटाइन’

 

Related Posts