IMPIMP

PM मोदींच्या बांगलादेश दौऱ्याला विरोध, 4 आंदोलकांचा मृत्यू

by pranjalishirish
four killed in bangladesh during protests against pm Narendra modi 's visit

ढाका : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी  Narendra Modi बांगलादेशाच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्या विरोधात आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन बांगलादेशातील चितगावमध्ये सुरु होते. यामध्ये 4 आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. यावेळी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आंदोलकांवर रबरी गोळ्यांचा मारा केला, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि कुटूंबीयांच्या नावे संपत्ती किती? जाणून घ्या

आंदोलकांना पांगवण्यासाठी आम्ही आधी आश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. पण परिस्थिती नियंत्रणात आली नाही. आंदोलक पोलीस ठाण्यात घुसले व मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यास सुरुवात केली. जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला मात्र, परिस्थिती नियंत्रणात आली नाही. त्यामुळे रबरी गोळ्यांचा मारा करण्यात आला, अशी माहिती रफिकुल इस्लाम या पोलीस अधिकाऱ्याने रॉयरला बोलताना दिली.

दुर्दैवी ! फॅशन स्ट्रीटची आग विझवून घरी परतताना कॅन्टोनमेंट बोर्डाच्या अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या Narendra Modi दौऱ्याविरोधात राजधानी ढाकामध्येही आंदोलन करण्यात आले. इथेही आंदोलनाला हिंसक वळण लागलं. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना कारवाई करावी लागली. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापटही झाली. यामध्ये अनेक जण जखमी झाले. जखमींमध्ये दोन पत्रकारांचा समावेश आहे.

… म्हणून देवेंद्र फडणवीस घाबरलेत, नवाब मलिकांचा पलटवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi  दोन दिवसीय बांगलादेश दौऱ्यावर आहेत. बांगलादेशाच्या स्वातंत्र्याच्या 50 व्या वर्धापन दिन साजरा करण्यासाठी मोदी बांगलादेशात पोहचले आहेत. यावेळी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी त्यांचे स्वागत केले व मोदींना गार्ड ऑफ ऑनर दिला गेला. या ठिकाणी पोहचल्यानंतर सर्वप्रथम मोदींनी ढाका मधील सावर येथील शहीद स्मारकास भेट दिली. याठिकाणी वृक्षारोपण करुन तेथील व्हिजिटर्स बुकमध्ये संदेश लिहून सही केली.

Also Read : 

Coronavirus in Maharashtra : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी CM ठाकरेंचा मोठा निर्णय ! राज्यात रविवारपासून रात्रीची संचारबंदी

‘एप्रिल फूल’ समजू नका, नियम न पाळल्यास कठोर निर्णय घेणार : अजित पवार

जितेंद्र आव्हाडांचं ‘प्रत्युत्तर’, म्हणाले – ‘फडणवीसांनी ‘हे’ मान्य केलं तेच खूप झालं’

फोन टॅपिंग अहवाल लीक : रश्मी शुक्ला यांच्या प्रकरणात गुन्हा दाखल, सायबर सेल करणार पहिल्यांदा तपास

Related Posts