IMPIMP

Gopichand Padalkar Car Attack। ‘घोंगडी बैठकांमुळे राष्ट्रवादी जागेवरून हललीय, मुद्यावरून गुद्द्यावर आलीय’

by bali123
gopichand padalkar criticized sharad pawar ncp after car attacked

सोलापूर : सरकारसत्ता ऑनलाइन Gopichand Padalkar Car Attack। भाजपचे (BJP) नेते आणि विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या कारवर बुधवारी रात्रीच्या दरम्यान हल्ला करण्यात आला. यावरून पडळकर यांनी राष्ट्रवादीला (NCP) टार्गेट केले आहे. ‘माझ्या राज्यभर घोंगडी बैठकांमुळे राष्ट्रवादी जागेवरून हललीय. मुद्द्यांची बात करणारी राष्ट्रवादी गुद्द्यांवर आलीय. राष्ट्रवादीचा (NCP) खरा चेहरा लोकांसमोर आलाय. बहुजनांवर अन्याय करणारे हे लोक आहेत. माझं शरद पवारांना (Sharad Pawar) आव्हान आहे की त्यांनी सांगावं, मुद्यावर बोलत असताना डोक्यात दगड घालायचं हे कोणत्या कलमात लिहलं आहे असा जोरदार हल्लाबोल पडळकर पडळकर यांनी केलाय. त्यावेळी ते सोलापुरात माध्यमाशी बोलत होते. gopichand padalkar criticized sharad pawar ncp after car attacked

काय म्हणाले पडळकर?

गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) म्हणाले, ‘मी शरद पवारांवर (Sharad Pawar) काय टीका केली होती.
मग मी बोललेलं इतकं वाईट वाटत असेल तर तुम्ही मोदींवर का बोलता?”, असा प्रतिसवाल पडळकर यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना केला आहे. माझा आवाज कोणी दाबू शकत नाही.
बहुजनांना जागं करण्याचा माझा प्रयत्न आहे,असं ते म्हणाले. ‘अजित पवारांनी काही आरक्षण घालवलं. ओबीसींचं आरक्षण यांच्या नाकर्तेपणामुळे गेलं, असे आरोप केला.
तर बहुजनांना जागं करण्याचं काम मी करत आहे. माझं हे काम मी थांबवणार नाही.
माझा आवाज कुणी दाबू शकत नाही, असं देखील पडळकर (Gopichand Padalkar) यांनी म्हटलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पुढे पडळकर म्हणाले की, ‘जरी माझ्या गाडीवर हल्ला झाला असेल तरी माझं आमच्या कार्यकर्त्यांना आवाहन आहे की आपण विचारांची लढाई विचारांनी लढू”, असं पडळकर म्हणाले.
तसेच, ‘विचारांची लढाई ही विचारांनी लढली पाहिजे असं सांगताना मुद्द्यांवर बोला म्हणणारी राष्ट्रवादी आता गुद्द्यांवर का आली, असा प्रश्न गोपीचंद पडळकर यांनी विचारला आहे.
दगडफेकीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी विचारपूस करण्यासाठी फोन केल्याचं पडळकर यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कारवर बुधवारी (30 जून) रात्रीच्या दरम्यान हल्ला करण्यात आला. दगडफेकीनंतर गोपीचंद पडळकर हे चांगलेच आक्रमक झाले आहेत.
राष्ट्रवादीला गर्भित इशारा देताना दगडच काय गोळी घातली तरी मी शांत बसणार नसल्याचं पडळकर यांनी सांगितलं आहे.
यावरून पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादीला टार्गेट केले आहे.

Web Title : gopichand padalkar criticized sharad pawar ncp after car attacked

Related Posts