IMPIMP

‘केरळचे लोक सुशिक्षित असल्याने भाजपला मतं मिळत नाही’, भाजप नेत्याचे वक्तव्य

by pranjalishirish
kerala bjp mla o rajagopal kerala assembly election 2021 educated people vote

नवी दिल्ली : सरकारसत्ता ऑनलाइन – देशातील पाच विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाली आहे. त्यानुसार, आता मतदानही सुरु होणार आहे. त्यापूर्वी भाजप BJP, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस यांसह विविध पक्षांकडून प्रचारसभांचा धडाका लावला जात आहे. त्यातच आता केरळमधील भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने राज्यात भाजपला मतं न मिळण्याचे कारण सांगितले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की ‘राज्यात सर्वाधिक साक्षरता दर आहे. त्यामुळेच इथं भाजपला जास्त मतं मिळत नाही’.

वेगवेगळया विचारसरणींच्या पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या सरकारांबाबत इतिहास काय सांगतो ? जाणून घ्या

केरळ विधानसभेच्या 140 जागांसाठी 6 एप्रिलला मतदान होत आहे. त्यानुसार ही निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यातच केरळमधील नेमोमचे भाजपचे BJP एकमेव आमदार ओ. राजगोपाल यांना भाजपला राज्यात अपेक्षित यश का मिळत नाही? पण हरियाणा, त्रिपुरा या राज्यात भाजप सत्तेत आहे. तर पश्चिम बंगालमध्ये प्रमुख पक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, ‘केरळमध्ये भाजपला मतं न मिळण्याचे दोन-तीन कारणे आहेत. हे वेगळ्या प्रकारचे राज्य आहे. इथं लोक सुशिक्षित आहेत. ते मतं देण्यापूर्वी विचार करतात. हीच सुशिक्षित लोकांची सवय असते. 90 टक्के लोक साक्षर आहेत. राज्यात 55 टक्के हिंदू आणि 45 टक्के अल्पसंख्यांक आहेत. त्यामुळे दुसऱ्या राज्याशी तुलना करता येऊ शकत नाही. इथली परिस्थिती वेगळी आहे’.

मोठी बातमी ! अखेर राऊतांनी फडणवीस मुख्यमंत्री न होण्याचे सांगितलं कारण; म्हणाले…

दरम्यान, केरळमध्ये डाव्यांचे एलडीएफ सरकार सत्तेत आहे. पी. विजयन हे सध्या मुख्यमंत्रिपदावर आहेत. तर काँग्रेसही राज्यातील राजकारणात सक्रीय आहे. ओ. राजगोपाल यांच्या या विधानामुळे भाजपच्या BJP अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Also Read : 

Param Bir Singh : परमबीर सिंग यांच्याबाबत राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त येऊ शकतात अडचणीत

परमबीर सिंग, गृहमंत्री देशमुख यांच्यातील वाद उच्च न्यायालयात, 30 मार्चला सुनावणी

सरकारी कर्मचार्‍यांना आठवड्यात मिळेल 3 दिवसांची सुट्टी ? जाणून घ्या केंद्र सरकारचे उत्तर

‘दूध का दूध, पाणी का पाणी करावं’ – गृहमंत्री अनिल देशमुख

जाणून घ्या बीट ज्यूस पिण्याचे फायदे, विसरण्याचा आजार होईल दूर अन् इतरही फायदे

मग काय कॅन्सरच्या उपचारामध्ये केमोथेरपी नाही पुर्णपणे ‘प्रभावी’, झाला धक्कादायक खुलासा

सुप्रिया सुळेंनी घेतली सोनिया गांधींची भेट !

जाणून घ्या बीट ज्यूस पिण्याचे फायदे, विसरण्याचा आजार होईल दूर अन् इतरही फायदे

‘कोरोना’चा कहर ! सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या देशातील टॉप 10 शहरांमध्ये 9 शहरे महाराष्ट्रात

‘देवेंद्र फडणवीसांनी केवळ पोलिसांची खाती नव्हे, तर SRA मधील विकासकांनाही दिली होती नोटीस’ : भाई जगताप

‘…तसे झाले तर अनिल देशमुख यांच्या उलटतपासणीतून अनेक घटनांवर प्रकाश पडेल’; ‘या’ भाजप नेत्याचा दावा

Related Posts