IMPIMP

Kirit Somaiya | भाजप नेते किरीट सोमय्यांनी ही मागणी केल्यानं आमदार सुनील शेळकेंची अडचण वाढणार?

by nagesh
kirit somaiya demands probe into mla sunil shelke rs 10 crore illegal excavation

लोणावळा न्यूज : सरकारसत्ता ऑनलाइन –  आंदर मावळातील (Maval) आणि तळेगाव दाभाडे MIDC नजदीक आंबळे ठिकाणातील जवळपास दहा कोटी रुपयांच्या बेकायदेशीर उत्खननाची चौकशी केली जावी अशी मागणी भाजपचे (BJP) जेष्ठ नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केली आहे. राष्ट्रवादीचे आमदार सुनिल शेळके (MLA Sunil Shelke) बेकायदेशीर उत्खनन करून निसर्गाचा -हास करत असुन, हा प्रकार अत्यंत गंभीर असताना सत्ताधारी आमदारांना पाठीशी घालताहेत. असा गंभीर आरोप देखील सोमय्यांनी (Kirit Somaiya) केलाय. आमदार शेळके आणि राज्य सरकारवर (State Government) सोमय्यांनी टीकास्त्र सोडले आहे. शुक्रवारी तळेगाव येथे ते माध्यमांशी बोलत होते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

मावळ (Maval) तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या गौण खनिज उत्खननाची प्रत्यक्ष पाहणी आज भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केली.
मावळ मधील आंबळे गावालगत असलेल्या धरणापासून 100 फूट अंतरावर गौण खनिज उत्खनन होत असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
यामध्ये अवैधरित्या उत्खनन हे मावळचे राष्ट्रवादीचे (NCP) आमदार सुनील शेळके
(MLA Sunil Shelke) यांची कंपनी करत असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला आहे.

 

यावेळी बोलताना किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) म्हटलं आहे की, ‘ठाकरे सरकार
आल्यापासून फक्त भ्रष्टाचार करण्याचे काम केलेत, कोरोना काळात हे सरकार अयशस्वी ठरलं आहे.
कोणत्याच प्रकारचे नियोजन नसल्याचे दिसून येत आहे.
म्हणून रोज नवीन नवीन निर्णय देऊन ते रद्द करण्याचे काम सध्या ठाकरे सरकारचे सुरू आहे.
असा देखील आरोप त्यांनी केला आहे.
तर, ‘उत्खननातून निसर्ग प्रकृती छेडछाड होऊन मोठे नुकसान झाले आहे.
धरणापासून 100 फुटावर आमदाराचे उत्खनन आहे. सत्ताधारीच अशा प्रकारे उत्खनन करत आहे.
कोणाच्या आशीर्वादाने हे सुरू आहे. असं सोमय्या म्हणाले.

 

दरम्यान, या ठिकाणी पाहणी केली असता, गौणखनिज उत्खननाची परवानगी घेतलेल्या
ठिकाणी मोठा खड्ड्यात पाणी साचले आहे. तर 8 ठिकाणी काम सुरू आहे.
दगड, खडी, मशीन्स पडले आहेत. हे प्रकरण थेट वर पर्यंत घेऊन जाणार.
तसेच, बेकायदेशीर उत्खननाची चौकशी करावी यासाठी महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळ व केंद्रीय प्रदूषण मंडळाकडे याबाबत तक्रार दाखल केल्याचे म्हणाले.
यादरम्यान, याप्रकरणी सोमय्या यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री अश्विनी कुमार चौबे (Union Minister Ashwini Kumar Choubey) यांच्याकडे तक्रार दाखल केली असून त्यांच्याकडे देखील
याप्रकरणाची चौकशीची मागणी केलीय.

 

Web Title : kirit somaiya demands probe into mla sunil shelke rs 10 crore illegal excavation

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | कोरोना संसर्गाची तिसरी लाट ‘या’ महिन्यात येऊ शकते; अजित पवार म्हणाले…

Bank Holidays | 19 तारखेपासून 23 तारखेपर्यंत बंद राहतील ‘या’ ठिकाणच्या बँका, लागोपाठ 5 दिवस आहे सुट्टी – पहा List

9 to 5 Google | स्मार्टफोन किंवा गाडी चोरीला गेल्यास आता ‘नो-टेन्शन’, Google करणार हरवलेली वस्तू शोधण्यासाठी मदत

 

Related Posts