IMPIMP

‘चोराच्या उलट्या बोंबा’; फडणवीसांच्या टीकेला जयंत पाटलांचे जोरदार प्रत्युत्तर

by bali123
maharashtra budget 2021-22 updates jayant patil slams-to devendra fadnavis

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी आज (सोमवार) सभागृहात सादर केला. या अर्थसंकल्पावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली. या टीकेदरम्यान त्यांनी राज्याने पेट्रोल आणि डिझेलवरील कर माफ करून लोकांना दिलासा दिला नाही, असा आरोप कोला. या आरोपावर राष्ट्रवादीचे नेते आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील jayant patil यांनी जोरदार टीका करताना चोराच्या उटल्या बोंबा, असे म्हणत केंद्र सरकारकडे बोट दाखवले.

पेट्रोल, डिझेलवरील करामध्ये कपात केली जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, सरकारने कोणताही उल्लेख याबद्दल केला नाही. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. त्यांच्या टीकेला जयंत पाटील jayant patil यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, चोराच्या उटल्या बोंबा, असंच याच्यापेक्षा वेगळं वर्णन करता येणार नाही. ज्या टक्केवारीने पेट्रोल, डिझेलवर कर लावलेला आहे. केंद्र सरकारचा दर सातत्याने वाढतोय. शंभर रुपये पार केले. ही जबाबदारी पूर्णपणे दिल्लीतील मोदी सरकारची आहे. त्यांनी पेट्रोल, डिझेलवरील दर वाढवायचा, त्यावर देश चालवायचा आणि राज्यांनी कर न वाढवता जो आहे, तोच ठेवला. तर राज्यांना त्यांचे कर कमी करायला लावायचे, हा राज्यांवर अन्याय असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

अडचणीत आलेल्या अर्थव्यवस्थेला वेग
अर्थसंकल्पाबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले, अर्थसंकल्पामध्ये सर्वस्तरावर सर्वांना न्याय देण्याचं काम अर्थमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. विशेषत: रस्ते, जलसंपदा आणि पायाभूत सुविधा यामध्ये मोठी गुंतवणूक राज्य सरकारने केलेली दिसते. त्यामुळे कोरोनामुळे अडचणीत आलेल्या अर्थव्यवस्थेला वेग येईल, असे मला वाटते.

अपेक्षा भंग करणारा हा अर्थसंकल्प; आशिष शेलार

अर्थसंकल्प 2021-22 : जागतिक महिलादिनी सरकारचं मोठं ‘गिफ्ट’; महिलेच्या नावावर घर घेतल्यास…

शरद पवारांचा राज ठाकरेंना फोन ! नाणारबद्दल म्हणाले…

महिलांना ५० % आरक्षण दिलं पाहिजे; ‘या’ महिला खासदाराची राज्यसभेत मागणी

महिला दिन वर्षातून एकदाच का साजरा करायचा ? राज ठाकरेंची ‘ही’ पोस्ट व्हायरल

मराठा आरक्षणात अन्य राज्यांनाही पक्षकार करणार !

Related Posts