IMPIMP

Maharashtra Budget 2021 : आमदारांची साद अन् अजित पवारांचा प्रतिसाद; सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, रायगड, साताऱ्यासाठी मोठी घोषणा

by amol
maharashtra budget 2021 fm ajit pawar announces medical colleges 4 districts

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  मागील वर्षाच्या अर्थसंकल्पात Maharashtra Budget अनेक आमदारांनी आमच्या जिल्ह्यात धरण द्या, अशी मागणी केली. मात्र, कोरोना काळात यामध्ये बदल झाला आहे. आता आमच्या जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय द्या, अशी मागणी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभाग 12 जिल्ह्यांमध्ये महाविद्यालयं सुरू करण्याच्या प्रस्तावावर काम करत होते. आज विधानसभेत अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालय उभारणार असल्याची घोषणा केली.

अजित पवार Ajit Pawar यांनी अर्थसंकल्प Maharashtra Budget सादर करताना राज्यातील सातारा, सिंधुदुर्ग, रायगड आणि उस्मानाबाद या चार जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालय उभारणार असल्याची घोषणा केली. कोरोना संकटामध्ये आरोग्य सेवांसाठी 7500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच नागरी आरोग्य कार्यालयाची निर्मिती करणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. सातारा, अलिबाग आणि सिंधुदुर्गमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालय तयार करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारनं केंद्राकडे पाठवल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात Maharashtra Budget अर्थमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी महाविकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प आज (सोमवार) विधानसभेत सादर केला. कोरोनामुळे राज्यातील अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला असून, अशा वेळी मोठ्या खर्चाला कात्री लागण्याची शक्यता आहे. मात्र, या अर्थसंकल्पात सरकार काय देणार याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले होते. मागील वर्षी अर्थमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीचा 9500 कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प मांडला होता.

अर्थसंकल्प 2021-22 : जागतिक महिलादिनी सरकारचं मोठं ‘गिफ्ट’; महिलेच्या नावावर घर घेतल्यास…
शरद पवारांचा राज ठाकरेंना फोन ! नाणारबद्दल म्हणाले…
महिलांना ५० % आरक्षण दिलं पाहिजे; ‘या’ महिला खासदाराची राज्यसभेत मागणी
महिला दिन वर्षातून एकदाच का साजरा करायचा ? राज ठाकरेंची ‘ही’ पोस्ट व्हायरल
मराठा आरक्षणात अन्य राज्यांनाही पक्षकार करणार !

Related Posts