IMPIMP

Maharashtra Politics : ‘मार्च-एप्रिल’मध्ये महाराष्ट्रात राजकीय भूकंप ?, शिवसेनेचा भाजपला गंभीर इशारा

by sikandershaikh
Maharashtra Politics | bjp starts operation lotus in maharashtra march april shiv sena warning bjp

मुंबई :सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)Maharashtra Politics | काही दिवसांपूर्वीच पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यात अपयश आलं आहे. यानंतर पुदुच्चेरीतील सरकार कोसळलं. यामुळं काँग्रेसला मोठा झटका बसला. पुदुच्चेरी विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री नारायणसामी यांना बहुमत सिद्ध करण्यात अपशय आल्याची घोषणा केली होती. यानंतर मुख्यमंत्री नारायणसामी यांनी उपराज्यापालांकडे आपला राजीनामा दिला. या राजकीय घडामोडींनंतर आता महाराष्ट्रातही राजकीय (Maharashtra Politics) भूकंप होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला गंभीर इशारा दिला आहे.

काय म्हणाले संजय राऊत ?

शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले, भाजपनं पुदुच्चेरीसारखं छोटं राज्य सुद्धा काँग्रेसकडून हिसकावून घेतलं.
आता मार्च एप्रिलमध्ये महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस सुरू करणार असल्याचं भाजप पुढाऱ्यांनी जाहीर केलं आहे.
महाराष्ट्र आणि पुदुच्चेरीमध्ये फरक आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत.
इथं शिवसेना घटक पक्षांना सोबत घेऊन महाविकास आघाडीचं सरकार चालवत आहे,
महाराष्ट्रात शिवसेना आहे, त्यामुळं नुसती उठाठेव करू नये,
जे पेराल तेच उगवेल याचं भान ठेवावं असंही त्यांनी बजावून सांगितलं.

‘सत्ता आणि पैशाचा गैरवापर देशासाठी योग्य नाही’

पुढं बोलताना ते म्हणाले, दिल्लीत जे लोक बसले आहेत, ते सत्ता आणि पैशाचा जो गैरवापर करत आहेत
ते देशासाठी योग्य नाही, देशात विरोधी पक्ष नसेल तर लोकशाही नाही,
आणि लोकशाही नसेल तर देश नसेल आणि देश नसेल तर देश ईस्ट इंडिया कंपनी बनेल असं म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली.

Related Posts