IMPIMP

Maharashtra Politics News | अजित पवार भाजपासोबत जाणार?, शरद पवारांच्या नव्या भूमिकेमुळे राजकीय चर्चांना उधाण

by nagesh
 Maharashtra Politics News | ajit pawar will join bjp sharad pawars reaction

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन –  Maharashtra Politics News | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी अदानी प्रकरणात जेपीसीवरुन (JPC) घेतलेल्या भूमिकेमुळे काँग्रेससमोर (Congress) अडचणी निर्माण झाल्या आहेत. काँग्रेस आणि ठाकरे गटाने (Thackeray Group) जेपीसीची मागणी केली होती. परंतु शरद पवार यांन याची काही आवश्यकता नसल्याचे सांगितल्याने चर्चांना (Maharashtra Politics News) उधाण आलं. याच दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वात झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीला शरद पवार उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी भाजपसोबत (BJP) जाणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या सर्व चर्चांवर शरद पवार यांनी स्वत: स्पष्टीकरण दिले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राज्यातील सरकार अस्थिर आहे का? राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार का असा प्रश्न विचारला असता, राहुल गांधींसोबत झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीला मला बोलवलं होतं. परंतु मला इथं काही काम असल्याने मी बैठकीला गेलो नाही. पण मी उद्या दिल्लीला जाणार असून त्यांची भेट घेणार आहे. आम्ही सगळे त्यांच्यासोबत आहोत असं शरद पवार यांनी सांगितले. यावेळी अजित पवार (Ajit Pawar) भाजपासोबत जाणार का असा प्रश्न विचारला असता (Maharashtra Politics News) त्यांनी यावर बोलणं टाळलं. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

 

दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार लवकरच भाजपाबरोबर (BJP) जाणार असल्याचा दावा केला आहे. तर एवढ्या मोठ्या व्यक्तीबद्दल माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता काय सांगणार आहे,
असे म्हणत अजित पवार यांनी दमानिया यांच्या ट्विटची खिल्ली उडवली होती.

 

 

Web Title :-   Maharashtra Politics News | ajit pawar will join bjp sharad pawars reaction

 

हे देखील वाचा :

Pune PMC Transfer Of Engineers | पुणे महानगरपालिकेतील अभियंत्यांच्या तडकाफडकी बदल्या, 132 कनिष्ठ अभियंत्यांचा समावेश, जाणून घ्या कारण

Money Making Tips | कामाची बातमी ! 8% पर्यंत व्याज आणि पैशांची पूर्ण गॅरंटी, ‘या’ आहेत 5 सर्वात चांगल्या सरकारी बचत योजना

Pune Crime News | पोलीस असल्याचे सांगून तिघा चोरट्यांनी नेले अमेरिकन डॉलर चोरुन; गांजा बाळगल्याचे सांगत बॅग तपासणी करुन हातचलाखी

 

Related Posts