IMPIMP

उद्धव ठाकरेंनी PM मोदींकडे केलेल्या ‘त्या’ मागणीला आनंद महिंद्रांचा पाठिंबा

by pranjalishirish
mahindra group anand mahindra tweet maharashtra cm uddhav thackeray vaccination pm narendra modi

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन-  राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. कोरोना संसर्गाचा विळखा मोठ्या प्रमाणात तरुण वर्गाला बसल्याचे दिसत असून या वयोगटाला देखील विषाणूपासून वाचवणे आवश्यक आहे. त्यामुळे 25 वर्षापुढील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लस द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray  यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका पत्राद्वारे केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या या मागणीला महिंद्रा ग्रुपचे संचालक आनंद महिंद्रा यांनी देखील पाठिंबा दर्शवला आहे. लसीकरणाचा वयोगट ठरवण्याचा अधिकार केंद्र शासनाला असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना हे पत्र लिहिले आहे.

चंद्रकांत पाटलांचे मोठं वक्तव्य, म्हणाले – ‘कुणाच्या कुबड्या न घेता 2024 मध्ये स्वबळावर सरकार स्थापन करणार, आणि..

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  Uddhav Thackeray यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केलेल्या मागणीला आनंद महिंद्रा यांनी ट्विटच्या माध्यमातून पाठिंबा दर्शवला आहे. आनंद महिंद्रा यांनी सीएमओच्या ट्विटला रिट्विट करुन ‘थम’ देऊन आपला पाठिंबा दिला आहे. यापूर्वी आनंद महिंद्रा यांनी राज्यात लॉकडाऊन लागू न केल्या बद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले होते.

‘100 कोटींच्या टार्गेटची आठवण पदावरुन हटवल्यावरच का झाली?’, राज ठाकरेंचा सवाल

मुख्यमंत्र्यांनी काय म्हटले पत्रात ?

कोरोना संसर्गाचा विळखा मोठ्या प्रमाणात तरुण वर्गाला बसल्याचे दिसत असून या वयोगटाला देखील विषाणूपासून वाचवणे आवश्यक आहे. त्यामुळे 25 वर्षापुढील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लस द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  Uddhav Thackeray यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका पत्राद्वारे केली आहे. यापूर्वी 45 वर्षावरील व्यक्तींना लस द्यावी, अशी मागणी मी आधी केली होती आणि आपण ती मान्य केली. आता लसीकरण वयोगट आणखी कमी करा. मोठ्या संख्येने तरुण वर्ग, विशेषत: जो घराबाहेर कामाला जातो त्याला लस मिळाल्यास रुग्णसंख्या कमी होण्यास मदत होईल, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे. याशिवाय लसींचा पुरवठा देखील वाढवण्याची मागणी केली आहे.

 

Read More : 

‘अनिल देशमुखांच्या निवासस्थानी 100 कोटींबाबतचे पुरावे नष्ट करण्याचे काम सुरु, CBI ने कारवाई करावी’

‘सचिन वाझे, परमबीर यांनी जे केलं तेच देशमुखांनी कारावे, शरद पवार, उद्धव ठाकरेंनी वसुली करण्याचे सांगितलं असं थेट सांगावं’

जे समोर आलं ते फक्त हिमनगाच्या टोकाप्रमाणे, आगे आगे देखो…होता है क्या?’ – भाजप नेते गिरीश महाजन

राज ठाकरेंचा परप्रांतीयांवर पुन्हा ‘हल्लाबोल’, म्हणाले – ‘परप्रांतीयांमुळे महाराष्ट्रात कोरोना वाढतोय’

‘देशानं पहिल्यांदाच पोलीस बॉम्ब ठेवतात अन् गृहमंत्री हप्ता वसुली करताना पाहिलं’

अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर उदयनराजे शरद पवारांच्या भेटीला; चर्चांना उधाण

पश्चिम बंगाल : मतदानांपूर्वीच नेत्याच्या घरी EVM मशीन !

शिवेंद्रसिंहराजे म्हणतात – ‘व्यवसाय बंद ठेवून मरण्यापेक्षा…’

ताईंचा नवरा भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकलेला अन् ताई विचारतात, नवा वसुली मंत्री कोण ?

Raj Thackeray : ‘माझ्यासाठी अनिल देशमुखांचा विषय महत्त्वाचा नाही, अंबानींच्या घराखाली बॉम्बची गाडी ठेवली कुणी हे महत्त्वाचं

Related Posts